बॉक्स ऑफिसवर कबीर सिंहचा धुमाकूळ, तीन दिवसाची कमाई तब्बल…

पहिल्याच दिवशी 20 कोटींची कमाई केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर 'कबीर सिंह' चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. कबीर सिंह चित्रपटात अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहेत.

बॉक्स ऑफिसवर कबीर सिंहचा धुमाकूळ, तीन दिवसाची कमाई तब्बल...

मुंबई : पहिल्याच दिवशी 20 कोटींची कमाई केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंह’ चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. कबीर सिंह चित्रपटात अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहेत. या दोघांच्याही करिअरमधील पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून कबीर सिंह ठरला आहे. दोन दिवसात चित्रपटाने 42.92 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. रविवारी चित्रपटाने 27.91 कोटी रुपयांची कमाई केली. कबीर सिंह चित्रपटाने तीन दिवसात तब्बल 70.83 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चित्रपट समीक्षक तरण अदर्शने ट्वीट करत म्हटले की, “कबीर सिंह बॉक्स ऑफिसवर जोरदार कलेक्शन करत आहे. चित्रपट मेट्रो सिटीज, टिअर-2, टिअर-3 शहरात जोरदार चालत आहेत. तीन दिवसात सर्वाधिक कमाई करणारा शाहीदचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतीय बाजारात 20.21 कोटी, शनिवारी 22.71 कोटी आणि रविवारी 27.91 कोटी रुपयांची कमाई केली आहे”.

कबीर सिंहने अजय देवगनचा चित्रपट ‘टोटल धमाल’चा रोकॉर्ड मोडीत काढला आहे. टोटल धमाल चित्रपटाने विकेंड कलेक्शन 62.40 कोटी होते. कबीर सिंह चित्रपटाने ओपनिंग विकेंडमध्येच हा रेकॉर्ड मोडला आहे. शाहीद कपूरचा हा चित्रपट यंदा 2019 मधील नॉन हॉलिडे ओपनर चित्रपट झाला आहे. कबीर सिंह देशभरात 3123 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे.

नॉन हॉलिडे प्रदर्शित, ‘अ’ प्रमाणपत्र, नॉर्मल तिकीट रेट, क्रिकेट वर्ल्ड कप शिवाय बॉक्स ऑफिसवर कबीर सिंह चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातून स्पष्ट दिसत आहे की, प्रेक्षकांना शाहीद कपूरचा रोमँटिक अंदाज आवडला आहे.

कबीर सिंह तेलगू ब्लॉकबस्टर अर्जून रेड्डी यांचा हिंदी रीमेक आहे. प्रेमात वेडा झालेल्या मुलाची भूमीका शाहीद कपूरने साकारली आहे. चित्रपटात शाहीद कपूरच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले आहे. कियारा अडवाणीसह शाहीद कपूरची जोडी प्रेक्षकांना आवडलेली दिसत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI