बॉलिवूड अभिनेत्री कल्कीला लग्नाआधीच बाळ!

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री कल्की हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अनेक दिवसांपासून कक्ली तिच्या बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती.

बॉलिवूड अभिनेत्री कल्कीला लग्नाआधीच बाळ!

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री कल्की हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे (Kalki Koechlin). अनेक दिवसांपासून कक्ली तिच्या बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. त्यावरुन ती तिच्या येणाऱ्या बाळाची खूप आतुरतेने वाट पाहात असल्याचं भासत होतं. लग्नापूर्वीच गरोदर राहिलेल्या कल्कीने एका मुलीला जन्म दिल्यानंतर चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. कल्कीने बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गच्या बाळाला जन्म दिला आहे (Kalki Koechlin Pregnancy).

कल्कीच्या बाळाची पहिली झलक पाहण्यासाठीही चाहते आतुर झाले आहेत. कल्कीच्या बॉयफ्रेंडने त्यांच्या होणाऱ्या बाळाचं नावाचा देखील विचार केला आहे. हे एक असं नाव आहे जे मुलगा किंवा मुलगी दोघांवरही सूट करेल. कल्की आणि गाय हर्शबर्गने अद्याप लग्न केलं नाही. मात्र, आता लग्न करण्याचा विचार करत आहेत.

कल्कीने सांगितलं होतं की ती वॉटर बर्थच्या माध्यमातून बाळाला जन्म देऊ इच्छिते. ती या गोव्याला जाऊन बाळाला जन्म देणार होती. तिचाही जन्म गोव्यात पाण्यात झाला असल्याचं कल्कीने सांगितलं होतं. मात्र, अद्याप तिची प्रसूती कुठे आणि कशाप्रकारे झाली याबाबत माहिती उघड करण्यात आलेली नाही.

कल्कीने काही महिन्यांपूर्वी ती गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यावेळी ती लग्नापूर्वी गरोदर असल्याने तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. मात्र, मी गरोदर आहे म्हणून लग्न करणार नाही, अशी ठाम भूमिका तिने घेतली होती.

अनुराग आणि कल्कीचं नातं

सहा वर्षांपूर्वी जेव्हा कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपची पत्नी होती, तेव्हा तिचा आई होण्याला विरोध होता. कल्की आणि अनुरागचं लग्न 2011 मध्ये झालं आणि ते 2015 मध्ये वेगळे झाले.

मूळ फ्रेंच वंशीय असूनही कल्की बॉलिवूडमध्ये चांगलीच स्थिरावली आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देव.डी’ चित्रपटातील तिची चंद्रमुखीची व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरली होती. त्यानंतर द गर्ल इन येलो बूट्स, शैतान, जिंदगी ना मिलेगी दोबारा, शांघाय, ये जवानी है दिवानी, मार्गारेटा विथ अ स्ट्रॉ, गली बॉय यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट तिने केले. याशिवाय सेक्रेड गेम्स 2, मेड इन हेवन या वेब सीरिजमध्येही ती झळकली होती.

Kalki Koechlin gives birth to a baby girl

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI