वृद्धाच्या भोळेपणाचा फायदा घेत एटीएमचा पिन मिळवला, खात्यातून 80 हजार लंपास

वृद्धाच्या भोळेपणाचा फायदा घेत एटीएमचा पिन मिळवला, खात्यातून 80 हजार लंपास

कल्याणमध्ये एटीएम मशीनजवळ हातचलाखी करुन एका सेवानिवृत्त वृद्धाची 80 हजाराची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

Nupur Chilkulwar

|

Nov 07, 2020 | 5:23 PM

कल्याण : कल्याणमध्ये एटीएम मशीनजवळ हातचलाखी करुन एका सेवानिवृत्त वृद्धाची 80 हजाराची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस सीसीटी्व्हीच्या मदतीने तपास सुरु आहे (Kalyan Old Man Cheated By Youth During Withdrawal Money From ATM).

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणारे नरहरी शेळके हे सेवानिवृत्त आहेत. 3 नोव्हेंबर रोजी त्यांना काही पैशांची गरज होती. पैसै काढण्यासाठी ते विजयनगर येथील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये गेले. त्यांनी पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनमध्ये एटीएम कार्ड टाकले. पैसै निघाले नाहीत.

बराच वेळ त्यांनी प्रयत्न केला मात्र, पैसे निघाले नाही. तेव्हा त्यांच्या मागे रांगेत उभ्या असलेला एका तरुणाने सांगितले की, मी तुम्हाला पैसे काढून देतो. शेळके यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्या तरुणाने शेळके यांच्या हाताताली एटीएम कार्ड घेतले, मशीनमध्ये टाकून तुमचे पैसे निघत नाही, असे त्याने सांगितले. मात्र, नरहरी यांनी त्या तरुणाला एटीएमचा पिन नंबर दिला होता.

त्यानंतर शेळके तिथून निघून आले. काही वेळाने शेळके यांच्या मोबाईलवर पैसे काढल्याचे एका नंतर एक मेसेज येऊ लागले. तेव्हा त्यांची फसणवूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी नलावडे यांचे म्हणणो आहे की, नरहरी यांनी तरुणाच्या हाती एटीएम दिले होते. त्या तरुणाने मशीनमध्ये एटीएम कार्ड टाकून शेळके यांना परत केले. त्याला पिन नंबर माहित असल्याने त्याने दुसऱ्या एटीएममध्ये जाऊन 80 हजार रुपये काढले असावे. आता सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Kalyan Old Man Cheated By Youth During Withdrawal Money From ATM

संबंधित बातम्या :

मंदिरात प्रवेशबंदी असतानाही दानपेटीवर चोरट्याचा डल्ला, चोरी सीसीटीव्हीत कैद

गोंदियामध्ये 45 सेकंदांत 10 लाखांचे दागिने लंपास; चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें