Kangana Ranaut | शेतकरी आंदोलनात सामील ‘दादी’वर टीका, कंगनाला 7 दिवसांत माफी मागण्याचा ‘अल्टीमेटम’!

शेतकरी आंदोलनात सामील वृद्ध महिलेला दिल्लीच्या शाहीन बागेतील आंदोलनात सामील झालेल्या 90 वर्षांच्या बिलकीस बानो समजून, सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना रनौतने त्यांच्यावर टीका केली होती.

Kangana Ranaut | शेतकरी आंदोलनात सामील ‘दादी’वर टीका, कंगनाला 7 दिवसांत माफी मागण्याचा ‘अल्टीमेटम’!
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 12:44 PM

मुंबई : सतत नवीन पंगे घेत वादाच्या घेऱ्यात अडकणारी ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा नव्या प्रकरणात अडकली आहे (Kangana Ranaut Controversy). शेतकरी आंदोलनात सामील वृद्ध महिलेला दिल्लीच्या शाहीन बागेतील आंदोलनात सामील झालेल्या 90 वर्षांच्या बिलकीस बानो समजून, सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना रनौतने त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर आता कंगनाने माफी मागावी, अशी मागणी सुरू आहे. तर, पंजाब आणि हरियाणाच्या हायकोर्टातील चंडीगड स्थित जेष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हाकम सिंह यांनी कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे (Kangana Ranaut Controversy over criticizing 73 year old delhi farmer protester).

नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी सामील झाले आहेत. या आंदोलनात सामील झालेल्या एका वृद्ध महिलेला बिलकीस बानो समजून कंगनाने तिच्यावर टीका केली होती. तर, तिची टीका पाहून नेटकऱ्यांनी देखील तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. आंदोलन करणारी महिला ही बिलकीस बानो नसून, दुसरीच कोणीतरी आहे, हे लक्षात आल्यावर कंगनाने तिचे ट्विट डिलीटदेखील केले. परंतु, आता तिने या आजीची 7 दिवसांत माफी मागावी, अशी कायदेशीर नोटीस तिला पाठवण्यात आली आहे.

(Kangana Ranaut Controversy over criticizing 73 year old delhi farmer protester)

देशभरातील महिलांचा अपमान

वकील हाकम सिंह यांनी पाठवलेल्या या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘आंदोलन करणे हा प्रत्येक व्यक्तीचा संविधानिक विशेष अधिकार आहे. मात्र. कंगनाच्या या वक्तव्यामुळे आंदोलनात सामील झालेल्या वृद्ध महिलेसह देशभरातील इतर महिलांचा देखील अपमान झाला आहे. त्यामुळे कंगनाने या प्रकरणी माफी मागितली पाहिजे.’ तर, माफी न मागितल्यास कंगनाविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली जाईल, असे देखील या नोटीसमध्ये म्हणण्यात आले आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, कंगनाला माफी मागण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे (Kangana Ranaut Controversy over criticizing 73 year old delhi farmer protester).

काय आहे नेमके प्रकरण?

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात अनेक वृद्ध शेतकरी आणि त्यांची कुटुंबे सामील झाली आहेत. यात सामील एक 73 वर्षीय वृद्ध महिला, ज्यांना सगळे ‘दादी’ म्हणत आहेत, त्यांच्यावरच कंगनाने टीका केली आहे. ही वृद्ध महिला, शाहीन बागेतील आंदोलनात सामील ‘बिलकीस बानो’ असल्याचा दावा करणारे खोटे फोटो, संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या व्हायरल चर्चेमागचे सत्य जाणून न घेता, कंगनाने या प्रकरणात उडी घेत, त्या वृद्ध महिलेवर टीका केली.

कंगनाने आपल्या या ट्विटमध्ये म्हटले की, ‘हा..हा..हा.. या त्याच दादी आहेत, ज्यांना टाईम मॅगझिनने सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये सामील केले आहे. या आता 100 रुपयांत उपलब्ध आहेत. पाकिस्तानी पत्रकार भारताची आंतरराष्ट्रीयस्तरावर कुप्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला असे लोक हवे आहेत, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्यासाठी आवाज उठवू शकतील.’

सदर प्रकार लक्षात आल्यावर कंगनाने आपले ट्विट डिलीट केले. मात्र, यावर कुठलेही स्पष्टीकरण तिने अद्याप दिलेले नाही. तसेच तिने माफीदेखील मागितली नाही. कंगनाच्या या डिलीट ट्विटचे स्क्रीन शॉट काढून नेटकरी कंगनाला ट्रोल करत आहेत.

(Kangana Ranaut Controversy over criticizing 73 year old delhi farmer protester)

संबंधित बातम्या : 

जो बायडन म्हणजे ‘गजनी’, वर्षभरही सत्तेत राहणार नाहीत; कंगनाचं भाकीत

Kangana Ranaut | …हा तर लोकशाहीचा विजय; न्यायालयाच्या निर्णयानंतर कंगनाचा पलटवार

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....