कराडमधील पहिला रुग्ण कोरोनामुक्त, रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात निरोप

साताऱ्यातील कराड तालुक्यातील पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. या रुग्णाला टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून निरोप (Karad Corona Patient Free) देण्यात आला.

कराडमधील पहिला रुग्ण कोरोनामुक्त, रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात निरोप

सातारा : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Karad Corona Patient Free) आहे. तर दुसरीकडे कोरोना विषाणूंपासून मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. साताऱ्यातील कराड तालुक्यातील पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. या रुग्णाला टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

कराडमधील कृष्णा रुग्णालयातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण कोरोनापासून मुक्त (Karad Corona Patient Free) झाला आहे. या रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कृष्णा हॉस्पिटलच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांकडून तसेच डॉक्टरांकडून टाळ्यांच्या कडकडात निरोप देण्यात आला.

विशेष म्हणजे या रुग्णाने कोरोनाविरोधातील लढ्यात सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. या व्यक्तीने प्लाझमा उपचारासाठी रक्तदान करण्याची तयारीही दर्शवली आहे. त्यामुळे सर्व रुग्णालय प्रशासनाने त्यांचे आभार मानले.

कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन पूर्णपणे बरा होऊन घरी जात असल्याचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया कृष्णा वैद्यकीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.


Published On - 3:46 pm, Sat, 18 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI