कर्तारपूरपूरजवळ टीव्ही 9 मराठी! 70 वर्षे दुर्बिणीतून दिसणारं कर्तारपूर कसं आहे?

गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, गुरु नानक साहिब, पंजाब चंदीगड: कर्तारपूर कॉरिडॉरचं आज पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक या गावात भूमीपूजन होणार आहे. डेरा बाबा नानक हे भारतीय सीमेवरील शेवटचं गाव आहे. डेरा बाबा नानक गावापासूनच कर्तारपूर कॉरिडॉर तयार होणार आहे. या भूमीपूजनासाठी परिसरातील शीख बांधवांनी गर्दी केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर […]

कर्तारपूरपूरजवळ टीव्ही 9 मराठी! 70 वर्षे दुर्बिणीतून दिसणारं कर्तारपूर कसं आहे?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, गुरु नानक साहिब, पंजाब

चंदीगड: कर्तारपूर कॉरिडॉरचं आज पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक या गावात भूमीपूजन होणार आहे. डेरा बाबा नानक हे भारतीय सीमेवरील शेवटचं गाव आहे. डेरा बाबा नानक गावापासूनच कर्तारपूर कॉरिडॉर तयार होणार आहे. या भूमीपूजनासाठी परिसरातील शीख बांधवांनी गर्दी केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे.  कर्तारपूर कॉरिडरमुळे शीख बांधवांची 70 वर्षांची प्रतिक्षा संपली आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या संबंधाचा नवा धागा आहे. कर्तारपूर कॉरिडॉरला दोन्ही देशांनी मंजुरी दिली आहे. शीख भाविकांना केंद्र सरकारची ही मोठी भेट आहे. डेरा नामक साहिब ते पाकिस्तान सीमेपर्यंत हा कॉरिडॉर आहे.  पाक सरकार आपल्या भागात कॉरिडॉर तयार करणार आहे. यामुळे शीख भाविकांना थेट पाकिस्तानातील कर्तारपूरला दर्शनाला जाता येईल. भारत सरकारच्या निर्णयाचं पाकिस्तानात स्वागत करण्यात आलं. आज भारताचे उपराष्ट्रपती तर 28 नोव्हेंबरला पाकिस्तानचे पंतप्रधान भूमीपूजन करतील.

फाळणीत ताटातूट

भारताची फाळणी झाली, तेव्हा आपल्या देशातील पंजाबमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले काही गुरुद्वारे पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यापैकीच एक आहे कर्तारपूर येथील ऐतिसाहिक गुरुद्वारा. या ठिकाणी शीखांचे पहिले धर्मगुरु गुरु नानक देव यांनी आपली 18 वर्षे व्यतीत केली. त्यामुळे देशातील शीख भाविकांसाठी कर्तारपूरच्या गुरुद्वाराचं मोठं महत्त्व आहे. पण देशाच्या फाळणीनंतर हा गुरुद्वारा पाकिस्तानात गेल्यानंतर शीख भाविकांचं कर्तारपूरच्या गुरुद्वारात जाणं बंद झालं. त्यानंतर भारत पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर दुर्बीण लावून कर्तारपूरच्या गुरुद्वाराचं दर्शन घेतलं जाऊ लागलं.  आजही दरवर्षी लाखो भाविक डेरा नानक साहिब या भारतीय सीमेवरील शेवटच्या गावाशेजारी असलेल्या सीमेवरुन दुर्बीणद्वारे कर्तारपूरच्या गुरुद्वाराचं दर्शन घेतात.

या सीमेवर टीव्ही 9 मराठीची टीम थेट कर्तारपूरमध्ये पोहोचली आणि तिथला आढावा घेतला.

भारताचं शेवटचं गाव

डेरा नानक साहिब, हे भारतीय सीमेवरील शेवटचं गाव आहे. इथे असलेल्या भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेच्या पलिकडे चार किलोमीटरवर कर्तारपूरचा गुरुद्वारा आहे. या गुरुद्वाऱ्यात भारतीय शीख बांधवांना जाता यावं, म्हणून भारत सरकारनं कर्तारपूर कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सीमेवरील शेवटचं गाव असलेल्या डेरा नानक साहिब, या गावापासून ते सीमेपर्यंत भारत सरकार कॉरिडॉर बांधणार आहे. पाकिस्ताननेही आपल्या भागात, अशाच प्रकारचं कॉरिडॉर बांधावं, अशी इच्छा भारत सरकारने व्यक्त केली होती. त्यामुळे आता पाक सीमेपासून ते कर्तारपूरपर्यंत पाकिस्तानच्या हद्दीत पाक सरकारही कॉरिडॉर बांधणार आहे.

आज 26 तारखेला भारताचे उपराष्ट्रपती  या कॉरिडॉरचं भूमीपूजन करणार आहेत, तर 28 नोव्हेंबरला पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्या हद्दीतील कॉरिडॉरचं भूमीपूजन करणार आहेत. या कर्तारपूर कॉरिडॉरच्या निमित्तानं भारत आणि पाकिस्तानमधी ताणलेले संबंध सुधारायलाही मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कसं आहे कर्तारपूर?

कर्तारपूर पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यात आहे. भारताच्या सीमेपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्तारपूर इथे, शिखांचं श्रद्धास्थान असलेले गुरु नानक देव यांनी वयाची 18 वर्षे व्यतीत केली. 22 सप्टेंबर 1539 रोजी याच ठिकाणी गुरु नानक यांनी आपला देह ठेवला. त्यामुळे कर्तारपूर येथील गुरुव्दारा शीख भाविकांसाठी आस्थेचं सर्वात मोठं ठिकाण आहे. पण फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या या गुरुद्वारात दर्शनासाठी जाणं शक्य होत नाही. त्यामुळे डेरा नानक साहिब या भारतीय सीमेवरील शेवटच्या गाव परिसरात दुर्बीणच्या सहाय्याने कर्तारपूर गुरुद्वाराचं दर्शन घेतल्यानंतर, तिथे लागलेल्या भव्य अशा बॅनरचंही दर्शन भाविक घेतात.

कर्तारपूरच्या गुरुद्वारात थेट दर्शनाला जाता यावं, ही शीख भाविकांची गेल्या 70 वर्षांची प्रतिक्षा होती. कर्तारपूर कॉरिडॉरमुळे ती प्रतिक्षा आता संपलेली आहे. भारत सरकारकडून डेरा नानक साहिब या गावापासून सीमेपर्यंत कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे.  त्या कॉरिडॉरमध्ये अत्याधुनिक सोई सुविधा दिल्या जाणार आहे. शिवाय त्या ठिकाणी सीमेवर व्हिसा किंवा कर्तारपूरला दर्शनासाठी जाण्याची परवानगी देण्याची सोयंही असेल.

कुठे आहे कर्तारपूर?

कर्तारपूर सध्या पाकिस्तानात आहेत

पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यात कर्तारपूर आहे.

कर्तारपूर भारतीय सीमेपासून चार किलोमीटरवर आहे.

गुरू नानकांनी 18 वर्षे कर्तारपूरमध्ये व्यतीत केली

साक्षात्कारानंतर त्यांनी याच ठिकाणी राहून अनुयायी गोळा केले

कर्तारपूरलाच 22 सप्टेंबर 1539 रोजी गुरू नानकांनी देह ठेवला

कर्तारपूर कॉरिडॉर कसा असेल?

– पंजाबमधील डेरा बाबा नानक गावापासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत जोडरस्ता

– इथे यात्रेकरुंसाठी केंद्र सरकारच्या निधीतून सुविधा उभारणार

– अशाच सुविधा पाकिस्ताननेही उभाराव्यात, ही भारताची इच्छा

कर्तारपूर कॉरिडॉरचे फायदे

-शीख भाविकांची 70 वर्षांची प्रतिक्षा संपली

-कॉरिडॉरमुळे कर्तारपूर गुरुद्वाराचं थेट दर्शन घेता येणार

-भारत पाक संबंधांचा नवा अध्याय

-भारत आणि पाकिस्तानमधला तणाव कमी होण्यास मदत

-पंजाबमधील पर्यटन क्षेत्राचा विकास

– कॉरिडॉरसाठी भारत-पाक सरकारचं एकमत

गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, गुरु नानक साहिब, पंजाब

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.