AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Corona | कोल्हापुरात आतापर्यंत 1 लाख नागरिकांचा प्रवेश, सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातून?

गेल्या काही दिवसात जिल्ह्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाखाहून अधिक जणांनी प्रवेश केला आहे.

Kolhapur Corona | कोल्हापुरात आतापर्यंत 1 लाख नागरिकांचा प्रवेश, सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातून?
| Updated on: May 28, 2020 | 8:51 PM
Share

कोल्हापूर : मोठ्या शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत (Kolhapur Corona Migrants Update) असल्याने या शहरात असलेल्या चाकरमान्यांनी आपल्या गावाचा रस्ता धरला आहे. कोरोनाची भीती, लॉकडाऊनमूळे उद्योग धंद्यात तयार झालेलं अस्थिरतेच वातावरण यामुळे लाखो परप्रांतीय मजुरांनी आपल्या राज्यात जाणे पसंत केलं आहे. यामुळे गेल्या काही दिवसात जिल्ह्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाखाहून अधिक जणांनी प्रवेश केला आहे. तर जिल्ह्यातील 43 हजार परप्रांतीय मजूर श्रमिक ट्रेनने आपल्या (Kolhapur Corona Migrants Update) राज्यात रवाना झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 450 ज्या जवळ पोहचला असला तरी यातील बहुतांशी रुग्ण हे रेड झोन मधून आलेले आहेत. रेड झोन मधील शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या शहरात असलेले लोक आपापल्या जिल्ह्यात परतले.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात दीड लाखाहून अधिक जणांनी प्रवेश केला असून यात सर्वाधिक संख्या मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची आहे. रेड झोनमधून येणाऱ्या सर्वांची तपासणी आणि स्वॅब घेण्याचा महत्त्वाचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्वांसाठी 1,470 कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले असून दोन लॅबच्या माध्यमातून या सर्वांच्या स्वॅबची तपासणी होत आहे. स्वॅब तपासणी अहवालानंतरच संबंधितांना पुढे प्रवेश दिला जात असल्याने सामाजिक संसर्गला मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या जशी मोठे आहे, तसे कोल्हापुरातून परराज्यात किंवा आपापल्या जिल्ह्यात जाण्यासाठी बाहेर पडलेल्या लोकांची संख्या काही हजारात आहे. जिल्ह्यातील शिरोली कागल गोकुळ शिरगाव अशा औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे हजारो कामगार आपापल्या राज्यात परत (Kolhapur Corona Migrants Update) गेले आहेत.

परराज्यातील 43 हजार मजूर आतापर्यंत 34 ट्रेन मधून रवाना झाले आहेत. तर लॉकडाऊनलोड कोल्हापूर जिल्ह्यात अडकून पडलेले इतर जिल्ह्यातील 15 हजारहून अधिक प्रवासी आपापल्या जिल्ह्यात सुरक्षितपणे पोहोचले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर गेलेल्या मजुर, प्रवासी, यात्रेकरु यांच्या संख्येवर एक नजर

उत्तरप्रदेशमधील 16750, बिहारमधील 11504, मध्यप्रदेशमधील 2650, झारखंडमधील 2138, छत्तीसगडमधील 275, राजस्थानमधील 3620, गुजरातमधील 302, गोवामधील 490, कर्नाटकमधील 3398, आंध्रप्रदेशमधील 94, तेलंगनामधील 178, केरळमधील 74, तामिळनाडूमधील 369, ओरीसामधील 955, पश्चिम बंगालमधील 277, दिल्लीमधील 40, पूर्वेकडील राज्य 193, आणि इतर 171 असे एकूण 43 हजार 478 जण रवाना झाले आहेत.

राज्यातील मुंबई शहर 110, मुंबई उपनगर 16, ठाणेमधील 605, पालघरमधील 118, रायगडमधील 167, रत्नागिरीमधील 644, सिंधुदुर्गमधील 593, सातारामधील 706, सांगलीमधील 1852, सोलापूरमधील 2345, पुण्यामधील 2373, नाशिकमधील 288, धुळे 264, जळगावमधील 164, नंदुरबारमधील 168, अहमदनगरमधील 1138, औरंगाबादमधील 108, बीड 339, जालनामधील 88, उस्मानाबादमधील 775, लातुरमधील 1030, नांदेडमधील 272, परभणीमधील 435, हिंगोली 82, आमरावती 36, अकोलामधील 91, बुलढाणामधील 79, यवतमाळमधील 160, वाशिम 104, नागपूरमधील 57, भंडारा 36, वर्धा 46, गडचिरोली 37, चंद्रपूरमधील 90 आणि गोंदियामधील 114 असे एकूण 15 हजार 580 जण रवाना झाले (Kolhapur Corona Migrants Update) आहेत.

संबंधित बातम्या :

मुंबई-पुणे रिटर्नने बुलडाण्यात कोरोनाबाधितांची वाढ, आतापर्यंत 48 जणांना लागण

मुंबई पुण्यातील चाकरमान्यांनी अहमदनगरची चिंता वाढवली, जिल्ह्यात 94 कोरोनाबाधित

प्रवाशांनी वाढवली विदर्भाची चिंता, मुंबई-पुण्याहून आलेले 100 जण कोरोनाग्रस्त

कोरोनाबाधित एका रुग्णाने हजारोंची चिंता वाढवली, बीडमध्ये 12 गावं कडकडीत बंद!

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.