AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, DYSP ने मुश्रीफांना सुनावलं

कोल्हापूर: “सायेब, आम्ही नोकऱ्या करतोय, राजकारण करत नाही, वर्दीवर यायचं काम नाही, तुम्ही घरला जा”, अशा शब्दात कोल्हापूरचे डीवायएसपी सुरज गुरव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना सुनावलं. कोल्हापूर महापालिकेत आज महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या फोडाफोडीला आणि तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरवण्याला ऊत आला. आजच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर […]

नोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, DYSP ने मुश्रीफांना सुनावलं
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

कोल्हापूर: “सायेब, आम्ही नोकऱ्या करतोय, राजकारण करत नाही, वर्दीवर यायचं काम नाही, तुम्ही घरला जा”, अशा शब्दात कोल्हापूरचे डीवायएसपी सुरज गुरव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना सुनावलं. कोल्हापूर महापालिकेत आज महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या फोडाफोडीला आणि तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरवण्याला ऊत आला. आजच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर महापालिकेला छावणीचं स्वरुप आलं आहे. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र भाजपने त्यांना तगडं आव्हान दिलं आहे. वाचा: हसन मुश्रीफांना भिडणारे DYSP सुरज गुरव कोण?

आजच्या निवडणुकीसाठी माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ हे महापालिका हद्दीत आले. मात्र यावेळी डीवायएसपी सुरज गुरव यांनी त्यांना महापालिकेत प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्याला मुश्रीफ यांनी विरोध केल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली.

त्यावेळी सूरज गुरव म्हणाले,”गडचिरोलीला जातो नाहीतर घरला जातो, पण भीती घालायची नाही.आम्ही नोकरी करतोय राजकारण करत नाही. सायेब, आम्ही नोकऱ्या करतोय, राजकारण करत नाही, वर्दीवर यायचं काम नाही, तुम्ही घरला जा”

पोलीस अधिकाऱ्याने माजी मंत्री आणि विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना खडे बोल सुनावल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.

VIDEO:

कोल्हापूर महापौर निवडणूक

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आज महापौर-उपमहापौर निवडणूक झाली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर भाजपने तांत्रिकदृष्ट्या तगडं आव्हान दिलं होतं. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्याने पाच नगरसेवक अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरु होती. तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक पक्षांतर बंदीच्या कायद्यांतर्गत अपात्र झाले होते. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी होताना दिसत होतं. महापौर पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता मोरे रिंगणात होत्या, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून जयश्री जाधव यांना मैदानात उतरवण्यात आलं . मात्र पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश आजच येण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली होती. कारण या पाच नगरसेवकांमध्ये 4 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आणि एक भाजपचा होता.

पाच नगरसेवक अपात्र ठरले असते तर  भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी 4 नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज असती. दुसरीकडे शिवसेनेचे 4 नगरसेवक तटस्थ राहिले. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौरपद भाजपकडे खेचण्यासाठी शड्डू ठोकला असला, तरी भाजपसाठी ही लढाई तितकीशी सोपी नव्हती. पण भाजपने मंत्रालयातून ताकद लावल्याचा आरोप होत आहे. सध्या महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्ता आहे.

सध्या कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी 44 तर भाजप-ताराराणी आघाडीचे 33, आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत. मात्र अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे सर्व पक्षांचं गणित बिघडणार आहे.

कोल्हापूर महापालिका एकूण जागा – 81

*काँग्रेस-राष्ट्रवादी – 44, दोन अपात्र (राष्ट्रवादी) – 42, चार अपात्र ठरल्यास  – 38

*भाजप-ताराराणी – 33, एक अपात्र ठरल्यास – 32

*शिवसेना – 4 तटस्थ राहणार आहेत.

* त्यामुळे उर्वरित 77 जागांपैकी 36 जागा जो कोणी जिंकेल त्याचा महापौर होईल.

राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची पदे रद्द झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ 42 झाले आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केले नसल्याने कारवाई झाल्यास आणखी चार नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. त्यामुळे संख्याबळ 38 वर येईल. याच कारणास्तव भाजपच्या एका नगरसेवकाचे पद रद्द झाल्यास भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक 32 होतील. जर जात पडताळणी प्रमाणपत्रावरून नगरसेवकांवर कारवाई झालीच नाही, तर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजय निश्‍चित होण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात तब्बल नऊ नगरसेवकांचा फरक असेल.

कोल्हापूर महानगरपालिका महापौर निवडणूक

काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी एकूण 44 नगरसेवक ( काँग्रेस 27, राष्ट्रवादी 15, अपक्ष 2 )

भाजप ताराराणी आघाडी एकूण नगरसेवक 33 ( भाजप 13, ताराराणी 19, अपक्ष 1)

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे आधीच 2 नगरसेवक अपात्र झालेत, आता पुन्हा 4 नगरसेवक अपात्र झाल्यास सदस्य संख्या 38 वर येईल

शिवाय अश्विनी रामाने यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यांना मतदानास मज्जाव केल्यास काँग्रेस राष्ट्रवादीची संख्या 37 होऊ शकते

भाजप ताराराणी आघाडीतील एक नगरसेवक अपात्र झाल्यास त्यांची सदस्य संख्या 32 होईल

शिवसेनेचे 4 नगरसेवक तटस्थ राहणार

भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी 4 नगरसेवकांची

संबंधित बातम्या

बंटी-मुश्रीफांनी करुन दाखवलं, कोल्हापुरात आघाडीचाच महापौर  

नोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, DYSP ने मुश्रीफांना सुनावलं   

हसन मुश्रीफांना भिडणारे DYSP सुरज गुरव कोण?  

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.