अंधारात दोन महिला बॅग घेऊन निघाल्या, तेवढ्यात भूकंप आला आणि जे घडलं त्याने… कोणत्या होत्या त्या? काय करत होत्या?
कोलकात्यात एक धक्कादायक घटना घडली. दोन महिला, फाल्गुनी आणि आरती घोष यांनी सासूची हत्या करून तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला होता. हुगळी नदीत मृतदेह फेकण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला भूकंपामुळे अडथळा आला. भूकंपाच्या धक्क्यांनंतर बाहेर आलेल्या लोकांना त्यांचा संशय आला आणि पोलिसांना माहिती दिली.

पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन महिला अंधारात फिरत होत्या. त्यांच्या हातात बॅगा होत्या. हुगळी नदीच्या आसपास या महिला फिरत होत्या. त्यांचा इरादा अत्यंत खतरनाक होता. पण तेव्हा भूकंप झाला अन् या महिलांचा सर्व गेम फसला. असं काय घडलं? भूकंपामुळे खेळ खल्लास कसा झाला? या महिला कोण होत्या? इतक्या अंधारात काय करत होत्या?
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेक लोक घराच्या बाहेर पडले. त्यावेळी घाबरलेल्या या लोकांची नजर या दोन महिलांवर पडली. त्यावेळी या दोन महिला हातात बॅग घेऊन इकडे तिकडे का फिरत आहेत? असा सवाल या लोकांच्या मनात आला. यावेळी लोकांनी दोन्ही महिलांजवळ जाऊन त्यांना सवाल केले. त्यावेळी या महिलांनी आम्ही मायलेकी आहोत आणि आमचा पाळीव कुत्रा मेला. त्याची बॉडी घेऊन आम्ही फिरत आहोत. आणि बॉडी फेकायची आहे.
सुटकेस उघडायचीच नव्हती
महिलांच्या या म्हणण्यावर लोकांचा संशय अधिक वाढला. त्यांनी या महिलांना बॅग उघडून देण्यास सांगितलं. पण त्यांनी बॅग उघडण्यास नकार दिला. त्यामुळे लोकांचा संशय अधिकच वाढला. त्यांनी थेट पोलिसांना फोन केला. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी आले. त्यामुळे गर्दी आणखीनच वाढली. पोलिसांनी सुटकेस उघडली. पोलिसांनी सुटकेस उघडताच तिथे असलेल्या श्वासच जणू रोखला गेला. कारण बॅगेत एक मृतदेह होता. या मृतदेहाचं मुंडकं कापलेलं होतं. मृतदेहाचे दोन्ही पायही कापलेले होते.
सासूची हत्या
सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे या ठिकाणी लोकांची एकच गर्दी झाली. पोलिसांनी या दोन्ही महिलांना अटक केली. या महिलांची ओळखही पटली आहे. एकीचं नाव फाल्गुनी घोष असून ती 34 वर्षाची आहे. तर दुसरी तिची आई आरती घोष असून ती 55 वर्षाची आहे. फाल्गुनीने आई आरतीच्या मदतीने सासू सुमिता घोष यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये तिची बॉडी भरली होती.
या दोघीही उत्तर 24 परगना येथील मध्यग्राममधील राहणाऱ्या आहेत. ज्या ठिकाणी मृतदेह सापडला तिथून या महिलांचं घर 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्या अनेक वर्षांपासून कुम्हारटोलीमध्ये राहत होत्या. पोलिसांनी या दोन्ही महिलांची कसून चौकशी केली. त्यावेळी संपत्तीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यांना सासूचा मृतदेह हुगळी नदीत फेकायचा होता. त्या दोन्ही बाबू घाट आणि प्रिसेप घाटावरही गेल्या होत्या. पण भूकंपामुळे लोक घराच्या बाहेर आले. त्यामुळे या मायलेकीचा प्लान उघड झाला.