दिवसभरातील मोठ्या बातम्या 28/02/2019

पायलटच्या सुटकेसाठी वकिलाची मदत घेणार पायलटच्या सुटकेसाठी वकिलाची मदत घेणार नाही, विंग कमांडरच्या सुटकेसाठी भारत आक्रमक, संरक्षण मंत्रालयातल्या सूत्रांची टीव्ही 9 ला माहिती, पाकने पायलटला थेटपणे सोडण्याची अपेक्षा इम्रान खान मोदींसोबत चर्चेला तयार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करण्यास तयार, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची माहिती पाकिस्तानचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न, मेंढर सेक्टरमध्ये हवाई […]

दिवसभरातील मोठ्या बातम्या 28/02/2019
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
पायलटच्या सुटकेसाठी वकिलाची मदत घेणार

पायलटच्या सुटकेसाठी वकिलाची मदत घेणार नाही, विंग कमांडरच्या सुटकेसाठी भारत आक्रमक, संरक्षण मंत्रालयातल्या सूत्रांची टीव्ही 9 ला माहिती, पाकने पायलटला थेटपणे सोडण्याची अपेक्षा

इम्रान खान मोदींसोबत चर्चेला तयार

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करण्यास तयार, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची माहिती

पाकिस्तानचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न, मेंढर सेक्टरमध्ये हवाई हद्दीचं उल्लंघन

LIVETV पाकिस्तानचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न, मेंढर सेक्टरमध्ये हवाई हद्दीचं उल्लंघन https://t.co/ZVrpFyfwmI pic.twitter.com/BnwE1CwLkh

— TV9 Marathi (@TV9Marathi) February 28, 2019

आर्मी आणि एअरफोर्सची पत्रकार परिषद

भारतीय लष्कर आणि वायूदलाची आज संध्याकाळी संयुक्त पत्रकार परिषद

आमचा पराक्रम थांबणार नाही – मोदी

संपूर्ण देश जवानांच्या पाठीशी उभा आहे, जे अशक्य आहे ते शक्य होणार… देशाला अस्थिर करण्याचा शत्रूंचा प्रयत्न आहे, त्यामुळेच दहशतवादी हल्ले होत आहेत, आपली प्रगती त्यांना बघवत नाहीय, पण आमची एकजूट पहाडाप्रमाणे त्याचा सामना करत आहे – नरेंद्र मोदी

पोलीस महासंचालकपदी

राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून सुबोधकुमार जैस्वाल पदभार स्वीकारणार, जैस्वाल सध्या मुंबई पोलीस आयुक्त, तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती

संरक्षण मंत्री उद्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन उद्या जम्मू-काश्मीरला जाणार, जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार

संरक्षण मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी तिन्ही सेना प्रमुखांची बैठक बोलावली, थोड्याच वेळात बैठक

पाकिस्तानी विमानाचे अवशेष

भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या F16 विमानाचे अवशेष सापडले, पाकव्याप्त काश्मीरमध्ये विमानाचे अवशेष

Same picture circulating on social media claim this is an Indian MiG fighter, however multiple IAF sources confirm this is the wreckage of Pakistani F16 downed yesterday https://t.co/C7t5lYtP51

— ANI (@ANI) February 28, 2019

केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली – केंद्रीय कॅबिनेटची आज संध्याकाळी महत्वाची बैठक, पंतप्रतधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक, बैठकीत सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा करुन पाकिस्तानविरोधी कठोर कारवाई करण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती

पाकिस्तानातील विमानतळं बंद

पाकिस्तान – आजही पाकिस्तानातील 15 प्रमुख विमानतळावरील हवाई वाहतूक सेवा बंद, लाहोर , इस्लामाबाद , मुल्तान , गिलगिट, क्वेटा, कराची, बहावलपूर, पेशावर, सियालकोट, रहीम यार खान सुक्कुर , स्कादू आदी विमानतळं बंद आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर पुन्हा गोळीबार

जम्मू काश्मीर- कृष्णा घाटी आणि खाडीकरमारा भागात पुन्हा गोळीबार, पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय सैन्याचंही चोख उत्तर

अजित डोभालांची अमेरिकेशी चर्चा

नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानची चहूबाजूंनी कोंडीसाठी भारत कसोशीने तयारी करत आहे. यामध्ये भारतला अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनेही पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने बुधवारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करा, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र परिषदेत दाखल केला. एकीकडे ही पावलं उचलली जात असताना, तिकडे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. भारत-पाकिस्तानमध्ये सध्या वाढलेल्या तणावाबाबत रात्री उशिरा दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाली.

अमेरिकेचा भारताला पाठिंबा, डोभाल यांची अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.