Latur Assembly : लातूर शहर विधानसभा निवडणूकीत कोणाची होणार सरशी ? देशमुख-चाकुरकर घराण्यात टक्कर
लातूर शहर विधानसभा निवडणूकीत यंदा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ पूत्र अमित देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ.अर्चना पाटील यांच्या होणार आहे. सलग तीन वेळा निवडून आलेले अमित देशमुख आपला गड कायम राखतात की गमावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लातूर शहर विधान सभा मतदार संघातून यंदा स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ पूत्र अमित देशमुख चौथ्यांदा निवडणूक लढवित आहेत. यापूर्वी अमित देशमुख यांनी तीन वेळा विधान सभा निवडणूक जिंकलेली आहे. यावेळी मात्र भाजपाकडून प्रथमच तगडं आव्हान त्यांना देण्यात आलेले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ.अर्चना पाटील यांना भाजपाने तिकीट दिलेले आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.अर्चना पाटील यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीने विनोद खटके यांना उमेदवारी दिलेली आहे.त्यामुळे कागदावर तरी ही निवडणूक तिरंगी असली तरी मुख्य लढत देशमुख आणि चाकूरकर घराण्यात होणार असल्याने दोन्ही घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ...
