ऊसतोड कामगारांप्रमाणे आम्हालाही घरी जाऊ द्या, पुण्यातील स्पर्धा परीक्षार्थींंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ऊसतोड कामगारांप्रमाणे स्पर्धा परीक्षार्थींना घरी जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीने (MPSC student stuck in lockdown) केली आहे.

ऊसतोड कामगारांप्रमाणे आम्हालाही घरी जाऊ द्या, पुण्यातील स्पर्धा परीक्षार्थींंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us
| Updated on: Apr 18, 2020 | 12:43 PM

(संग्रहित फोटो)

पुणे : ऊसतोड कामगारांप्रमाणे स्पर्धा परीक्षार्थींना घरी जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीने (MPSC students stuck in lockdown) केली आहे. त्यासाठी समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आणि आमदार रोहित पवार यांना निवेदन पाठवलं आहे. (MPSC students stuck in lockdown) ऊसतोड मजुरांना घरी जाण्यास परवानगी मिळते, मग स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना परवानगी का नाही, असा सवाल, या समितीने विचारला आहे.

लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षांर्थींना घरी जाता आलं नाही. त्यातच हॉटेल्स, मेस बंद असल्याने जेवणा-खाण्याची समस्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून, कुटुंबीयही काळजी करत आहेत. त्यामुळे ऊसतोड कामगारांना लावलेला निकष विद्यार्थ्यांना लावावा, अशी मागणी MPSC समितीने केली आहे.

पुण्यात साधरण दोन हजार विद्यार्थी असल्याचा दावा या समितीचा आहे. कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती बिकट आहे. तीन मेपर्यंत लॉकडाऊन असला, तरी त्यानंतरही खबरदारी घ्यावी लागणार आहे, त्यामुळे जर विद्यार्थी घरी असले, तर त्यांच्या पोटा-पाण्याची व्यवस्था होईल, असं समितीचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारने योग्य विचार करुन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी, या समितीने केली आहे.

यूपीच्या विद्यार्थ्यांना राजस्थानातून आणणार

तिकडे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राजस्थानमधल्या कोटा शहरात अडकलेल्या 7500 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी 250 बसेस पाठवल्या आहेत.  IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी देशभरातून कोटामध्ये येत असतात.  21 दिवसांच्या लॉक डाऊनमध्ये विद्यार्थ्यांचे हाल होत होते. त्यामुळे योगी सरकारने बस पाठवून या विद्यार्थ्यांना परत आणण्याची तयारी केली. राजस्थान सरकारकडून योगी सरकारच्या या कृतीचं स्वागत केलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.