प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, 12 तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश, एल्गार परिषद आणि नक्षलवाद्यांशी संबधावरून पुणे पोलिसांनी केली होती अटक, अटक अयोग्य असल्याचं सांगत पुणे सत्र न्यायालयाने केली होती तेलतुंबडेंची सुटका, सुटकेनंतर अटकपूर्व जामिनासाठी तेलतुंबडेंची उच्च न्यायालयात धाव
राळेगणसिद्धी – छोटा पुढारी घनश्याम दरवडे राळेगणसिद्धीl दाखल, अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा
यादवबाबा मंदिरात अण्णांच्या खोलीत बैठकीची तयारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह आणि गिरीश महाजन,तिघांचे सचिव आणि अण्णांच्या बाजूनं सोनपाल नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष, किसान महासंघाचे शिवकुमार शर्मा हे सहभाग घेणार
शिर्डी – पुणतांब्यातील शेतकरी लेकींचं अन्नत्याग आंदोलन, अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस, राहात्याचे तहसिलदार माणिक आहेर आंदोलक मुलींच्या भेटीला, प्रशासनाकडून आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न
राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती रद्द करा, मुंबई हायकोर्टात याचिका
सुप्रीम कोर्टाकडून सीबीआयची मागणी मान्य, पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेश, ममतांना झटका
नागपूर – रामटेक येथील कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या परिसराचे नामकरण, परमपूजनीय माधव सदाशिव गोवळकर गुरुजी असं नवं नाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीला जाणार, अण्णा हजारेंशी चर्चा करुन उपोषण सोडण्याची विनंती करणार
पुणे: पुण्यात एका ‘मजनू’ने मुलींच्या वसतिगृहाबाहेर हवेत गोळीबार करुन शोबाजीचा प्रयत्न केला. ब्रेकअप झाल्याच्या रागातून या सिरफिऱ्या आशिकने थेट मुलीच्या हॉस्टेलबाहेर हवेत गोळ्या झाडल्या. बालेवाडी परिसरात ही घटना घडली. गोळीबार करणाऱ्या युवकाला चतु:श्रृंगी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.
अण्णांच्या आंदोलनाचा सातवा दिवस, कोणताही सरकारी कर्मचारी आणि अधिकारी गावात फिरु देणार नाही, गावकऱ्यांचा इशारा, आज चूल बंद आंदोलन, प्रत्येकाने बैलगाड्या आणि दुचाकी घेऊन गावातील रस्ते बंद करण्याचा निर्णय
उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांची बोलावली बैठक, युतीबाबत खासदारांकडे विचारणा करणार
कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणास मंजुरी, लवकरच भारताच्या ताब्यात, पण कोर्टात अपील करण्याचा मल्ल्याचा पवित्रा
केंद्र सरकारविरोधात ममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन सुरुच, तर आज सीबीआयच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
एक वर्षात लोकायुक्तांची नेमणूक होऊ शकली नाही त्यामुळे मुख्यमंत्री मनातून उतरले, अण्णा हजारेंचा उद्वेग, आज उपोषणाचा सातवा दिवस