लोगो ब्रँडेड, दारु मात्र अड्ड्यावरील, जालन्यातून टोळी जेरबंद

देशी दारू व विदेशी दारूचे बनावटी करण करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

  • Updated On - 5:17 pm, Tue, 27 April 21
लोगो ब्रँडेड, दारु मात्र अड्ड्यावरील, जालन्यातून टोळी जेरबंद

जालना : देशी दारू व विदेशी दारूचे बनावटी करण करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या टोळीकडून देशी दारूचे 20 बॉक्स, विदेशी दारूचे 7 बॉक्स विविध कंपनीचे बनावट लेबलसह रिक्षा व मोटरसायकल असा एकूण 2 लाख 28 हजार 654 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

3 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना माहिती मिळाली की, गोवा व दमन राज्यातील कमी किमतीची विदेशी दारू चोरट्या मार्गाने जालन्यात आणली जात आहे. ज्यावर बेकायदेशीर रित्या बॉटलवरील लेबल काढून त्यावर महाराष्ट्र राज्याचा परवाना असलेले बनावट लेबल लावून त्याची विक्री केली जात आहे. तसेच भिगरी कंपनीची बनावट देशी दारू तयार करून त्यावर बनावट स्टिकर लाऊन बेकायदेशीर विक्री केली जात आहे.

यानंतर पथकाने सापळा रचला. ते आनंदनगर येथील मैदानजवळ थांबले. तेथून जाणाऱ्या एका रिक्षावर त्यांना संशट आला. त्या रिक्षाला पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थांबवले. त्याची चौकशी केली, त्यानंतर पंचासमक्ष रिक्षाची पाहणी केली असता, रिक्षाच्या मागील सीटवर भिंगरी देशी दारूच्या बाटल्या असलेले 15 बॉक्स आढळून आले. त्यानंतर रिक्षा चालकाची कसून चौकशी केली असता, हा माल जलन्यातील कन्हैया नगरच्यी  जालना येथील साई अंगद या बंद धाब्याच्या गोडाऊनमध्ये नेत असल्याचं त्याने सांगितले.

रिक्षा चालक आणि त्याच्या सोबत असलेल्या साथीदाराला घेऊन  पथकाने साई अंगद या बंद धाब्याच्या गोडाऊनवर झडती घातली. तेथे पथकाला मोठ्या प्रमाणात विविध देशी-विदेशी दारूचा साठा व हॉटेलवर लावण्यासाठी असलेले बनावट लेबल आढळले. यानंतर पथकाने तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींचे नाव नाव शेख वसीम शेख रियाज, जुगल मदनलाल लोहिया, मुकेश रावसाहेब राऊत आहेत.