खोटारड्या ट्रम्पविरोधात मोदींनी स्वत: स्पष्टीकरण द्यावं, विरोधकांचा संसदेत गोंधळ

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्या काश्‍मीर मुद्यावर मध्‍यस्‍थीबाबतच्या वक्तव्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज गदारोळ झाला. काँग्रेसने सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारला याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.

खोटारड्या ट्रम्पविरोधात मोदींनी स्वत: स्पष्टीकरण द्यावं, विरोधकांचा संसदेत गोंधळ
Follow us
| Updated on: Jul 23, 2019 | 12:37 PM

नवी दिल्‍ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्या काश्‍मीर मुद्यावर मध्‍यस्‍थीबाबतच्या वक्तव्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज गदारोळ झाला. काँग्रेसने सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारला याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.  तर, हा एक राष्ट्रीय मुद्दा आहे, या मुद्यावर राजकारण करु नये, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी विरोधकांना सांगितलं.

राज्यसभेत काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा मुद्दा उपस्थित केला. यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत निवेदन दिलं. त्यांनी ट्रम्प यांचं वक्तव्य तथ्यहीन असल्याचं सांगितलं. जोपर्यंत सीमेवरील दहशतवाद संपत नाही तोवर पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारची चर्चा केली जाणार नाही. पंतप्रधान मोदींनी अशाप्रकारचा कुठलाही प्रस्ताव ट्रम्प यांना दिलेला नाही, हे मी सभागृहाला स्पष्ट करु इच्छितो, असं एस. जयशंकर यांनी सांगितलं.

हेही वाचा : अमेरिकेत इम्रानच्या अब्रूचं खोबरं, स्वागताला कुणीच नाही, मेट्रोने जावं लागलं!

मात्र, परराष्ट्र मंत्र्यांच्या स्पष्टीकणानंतरही राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ सुरुच होता. त्यामुळे सभापती व्यंकया नायडू यांनी दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यसभेचं कामकाज स्थगित केलं.

इम्रान खानच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान इम्रान खान यांनी काल (23 जुलै) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेतली. यावेळी इम्रान खान यांनी ट्रम्प यांना काश्मीर प्रश्नावर लक्ष द्या, असं गाऱ्हाणं घातलं. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी ते काश्मीर प्रश्नी मध्यस्थीसाठी तयार असल्याचं सांगितलं. तसेच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात मदत मागितल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र, भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. काश्मीर प्रश्नावर भारताने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कुठल्याही प्रकारची मदत मागितली नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) स्पष्ट केलं. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याकडे अशाप्रकारची कुठलीही विनंती केली नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.

यानंतर ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरुन आज संसदेचं विरोधकांनी गोंधळ केला.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.