LPG Cylinder : सिलेंडर घेताना तुम्ही सहज विसरता ‘ही’ गोष्ट, आताच तपासा नाहीतर होईल नुकसान

बहुतेक लोक घरात 14.2 किलो एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) वापरतात. पण सिलेंडर घेताना तुमची अनेकवेळा फसणूक होत असल्याचं समोर आलं आहे.

LPG Cylinder : सिलेंडर घेताना तुम्ही सहज विसरता 'ही' गोष्ट, आताच तपासा नाहीतर होईल नुकसान
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 10:20 AM

मुंबई : आपल्या रोजच्या सगळ्यात महत्त्वाच्या गरजांमधली एक गरज म्हणजे एलपीजी (LPG) सिलेंडर. खरंतर, बहुतेक लोक घरात 14.2 किलो एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) वापरतात. पण सिलेंडर घेताना तुमची अनेकवेळा फसणूक होत असल्याचं समोर आलं आहे. बरेच लोक चांगले स्वच्छ सिलेंडर विकत घेतात. परंतु एलपीजी सिलेंडर वापरताना ग्राहकांनी बरीच सावधगिरी बाळगली पाहिजे. (lpg cylinder news take cylinder directly from dealer and weight it to avoid fraud lpg cylinder rate indane gas bharat gas)

सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट जी आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे सिलेंडरचा शिक्का. तर दुसरं म्हणजे सिलेंडरची टाकी सिल पॅक असली पाहिजे. कारण यामुळे सिलेंडरमधून गॅस चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. घरगुती एलपीजी सिलेंडरमधील वायूचं (Liquid Petroleum Gas) वजन 14.2 किलो आहे. उरलेल्या सिलेंडरचं वजन 15 ते 17 केजी आहे. सिलेंडरच्या टाकीवर हे वजन स्पष्ट लिहलेलं असतं. जर तुमच्या सिलेंडरचे वजन 15.8 किलो असेल तर त्यात एकूण गॅस 30 किलोग्रॅम असावा. पण अनेक वेळा वजन चेक केलं जात नाही, त्यामुळे नागरिकांची फसवणूक केली जाते.

थेट विक्रेतांकडून खरेदी करा गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर विकण्यासाठी अनेक एजन्सी वेगवेगळ्या तेल कंपन्यांकडे फ्रँचायझी घेतात, त्यांच्यात काम करणारे कामगार किंवा खाजगी विक्रेते फसवणूक करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे इतर कुठलाही नुकसानीचा मार्ग निवडण्यापेक्षा थेट विक्रेत्यांकडूनच गॅस सिलेंडर खरेदी करा. गॅस सिलेंडर खरेदी करताना त्याचं वजन करून पाहायला विसरू नका याने फसवणुकीचा धोका कमी आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराने चिंतेत असणाऱ्या व्यावसायिक, वाहतूकदार आणि सामान्य लोकांना आणखी एक धक्का बसणार आहे. कारण, घरगुती सिलेंडरच्या (LPG) थोडीथोडकी नव्हे तर 50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानित सिलेंडरसाठी आता जवळपास 769 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 14.2 किलो LPG सिलेंडर गॅसची किंमत 719 रुपये इतकी होती. घरगुती सिलेंडरच्या या वाढलेल्या किंमतीमुळे सामान्य गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.

अर्थसंकल्पादिवशी कमर्शियल गॅस महागला

देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने कमर्शियल ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. 19 किलो वजनाच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. कमर्शियल LPG सिलिंडरचे दर 190 रुपये प्रति सिलिंडरने वाढले आहेत. यापूर्वी गेल्या महिन्यात तेल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत दोन वेळा 100 रुपयाने वाढ केली होती. कंपनीनं यापूर्वी 2 डिसेंबरला 50 रुपये आणि 15 डिसेंबरला 50 रुपयांनी प्रति सिलिंडरने वाढ केली होती.

एलपीजी किंमत कशी तपासायची?

स्वयंपाक गॅसची किंमत तपासण्यासाठी आपल्याला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देऊन आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर तपासू शकता. (lpg cylinder news take cylinder directly from dealer and weight it to avoid fraud lpg cylinder rate indane gas bharat gas)

संबंधित बातम्या –

SBI कडून अलर्ट! नोकरीच्या शोधात एक चूक पडेल महागात, फसवणुकीपासून ‘असे’ राहा सावध

SBI, HDFC बँक, ICICI आणि BOB ची स्पेशल FD ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

भारतात आज लॉन्च होणार Renault kiger, काय आहे धमाकेदार SUV ची किंमत आणि फीचर्स

मोठी बातमी: ‘कॉमन मॅन’चं बजेट कोलमडणार; घरगुती सिलेंडरच्या दरात इतक्या रुपयांची वाढ

(lpg cylinder news take cylinder directly from dealer and weight it to avoid fraud lpg cylinder rate indane gas bharat gas)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.