AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिंताजनक! आधी भारताने, आता महाराष्ट्रानेही कोरोना रुग्णसंख्येत चीनला टाकलं पिछाडीवर

चीनमध्ये आतापर्यंत एकूण 83,040 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली, तर महाराष्ट्रात एकूण आकडा 85 हजार 975 वर गेला आहे.(Maharashtra COVID Patients surpasses China Total Corona Positive Patients)

चिंताजनक! आधी भारताने, आता महाराष्ट्रानेही कोरोना रुग्णसंख्येत चीनला टाकलं पिछाडीवर
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jun 08, 2020 | 12:46 PM
Share

मुंबई : देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. आधी भारतातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येने चीनमधील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीला पिछाडीवर सोडलं होतं. आता एकट्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा चीनमधील रुग्णसंख्येपेक्षा अधिक झाल्याने चिंता वाढली आहे. (Maharashtra COVID Patients surpasses China Total Corona Positive Patients)

महाराष्ट्रात कालच्या दिवसात (रविवार 7 जून) 3007 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने एकूण आकडा 85 हजार 975 वर गेला आहे. यापैकी 39 हजार 314 रुग्ण आतापर्यंत उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या राज्यात 43 हजार 591 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

चीनमध्ये आतापर्यंत एकूण 83,040 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकट्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा संपूर्ण चीन देशातील कोरोना रुग्णांपेक्षा जास्त झाला आहे.

हेही वाचा : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चीनच्या दुप्पट, बळींचा आकडाही जास्त

देशात एका दिवसातील रुग्णसंख्यावाढ नवनवे उच्चांक गाठत असल्याने चिंता वाढली आहे. आज सकाळी (सोमवार 8 जून) 9 वाजता आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात भारतात 9 हजार 983 नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले. ही देशातील एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. गेल्या 24 तासात 206 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 2 लाख 56 हजार 611 वर गेला आहे. यामध्ये 1 लाख 25 हजार 381 अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. जवळपास तितकेच म्हणजे 1 लाख 24 हजार 095 जण कोरोनामुक्त झाले आहेत, ही दिलासादायक बाब. तर आतापर्यंत 7 हजार 135 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत चीन मागे-मागे जाण्याची करामत करत आहे. तर भारत सहाव्या स्थानावर झेपावला आहे. भारताने कोरोनाबळींमध्ये चीनलाही मागे टाकलं आहे. गेल्या काही दिवसात भारताने  इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्की आणि इराण या देशांना मागे टाकले.

भारताच्या पुढे असलेल्या (पाचव्या स्थानावर) यूकेमध्ये 2 लाख 86 हजार 194 रुग्ण आहेत. तर चौथ्या क्रमांकावरील स्पेनमध्ये 2 लाख 88 हजार 630 रुग्ण सापडले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या काही दिवसात त्यांच्यापेक्षा जास्त होण्याची भीती वर्तवली जात आहे.

संबंधित बातमी : कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर, 24 तासात 6977 नवे रुग्ण

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेली अमेरिका (20 लाखाहून अधिक), ब्राझील (6 लाख 91 हजार 962) तर रशिया (4 लाख 67 हजार 673) अशी आकडेवारी आहे.

स्रोत : https://www.worldometers.info/coronavirus/

(Maharashtra COVID Patients surpasses China Total Corona Positive Patients)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ