AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्थिक सर्वेक्षण अहवाल विधीमंडळात सादर, कर्जाचा बोजा वाढला, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण

महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 1 लाख 91 हजार 737 रुपये असल्याचं आर्थिक सर्वेक्षण अहवालातून समोर आलं आहे. Maharashtra Economic Survey Report

आर्थिक सर्वेक्षण अहवाल विधीमंडळात सादर, कर्जाचा बोजा वाढला, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण
Maharashtra Vidhansabha
| Updated on: Mar 05, 2020 | 2:48 PM
Share

मुंबई : राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज विधानसभेत सादर करण्यात आला. राज्यावरील कर्जाचा भार वाढला असून महसुली तूटही वाढली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. (Maharashtra Economic Survey Report)

राज्यावर चार लाख 71 हजार 642 कोटी रुपयांचे कर्ज आहे. महसूली तूट 20 हजार 293 कोटी रुपयांवर, तर वित्तीय तूट 61 हजार 670 कोटींवर गेली आहे. राज्याच्या विकासदरात 5.7 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. तर कृषी आणि संलग्न कार्यांमध्ये 3.1 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.

महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 1 लाख 91 हजार 737 रुपये असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांनंतर दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे.

आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्त्वाची निरीक्षणं

महसुली तूट – 20 हजार 293 कोटी – वित्तीय तूट – 61 हजार 670 कोटी – कर्ज – 4 लाख 71 हजार 642 कोटी

राज्यावरील वाढलेले कर्जाचा बोजा

2018-19 मध्ये राज्यावर 4 लाख 14 हजार 411 कोटींचं कर्ज होतं. त्यावर व्याज 33 हजार 929 कोटी होतं. आता वर्ष 2019-20 मध्ये कर्ज 4 लाख 71 हजार 642 कोटीवर गेलं आहे. तर व्याज 35 हजार 207 कोटी द्यावे लागणार आहे.

राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या तुलनेत राजकोषीय तूट 2.7 टक्के इतकी आहे. तर राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या तुलनेत ऋणभार वाढून 22.4 टक्क्यावर गेला आहे.

वेतनावर खर्च

2018-19 मध्ये 78 हजार 630 कोटी

2019-20 मध्ये 1 लाख 15 हजार 241 कोटी

सातव्या वेतन आयोगामुळे 24 हजार कोटी वेतनावर खर्च वाढला

निवृत्तीवेतन

2018-19 मध्ये 27 हजार 567 कोटी

2019-20 मध्ये 36 हजार 368 कोटी अपेक्षित

रोजगारात घट

आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत राज्यात दीड लाख रोजगार कमी झाला आहे. 2018-19 या वर्षी राज्यात 73 लाख 50 हजार रोजगार उपलब्ध होता. 2019-20 या वर्षी राज्यातील रोजगारात घट होऊन तो 72 लाख 3 हजारवर आला आहे. म्हणजेच राज्यातील रोजगारात 1 लाख 47 हजाराची घट झाली. याशिवाय राज्याचा बेरोजगारीचा दर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. देशात राज्य पाचव्या क्रमांकावर आहे.

राज्याचा बेरोजगारी दर 8.3 टक्के आहे. कर्नाटकचा 4.3 टक्के, तर गुजरातचा 4.1 टक्के आहे. पश्चिम बंगलचा बेरोजगारी दर 7.4 टक्के आहे.

महिला अत्याचारात वाढ

2018 मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या 35 हजार 497 घटना घडल्या. 2019 मध्ये हे प्रमाण वाढले. गेल्या वर्षात महिला अत्याचाराच्या 37 हजार 567 घटना घडल्या. 2017 मध्ये बलात्काराचे गुन्हे 4 हजार 320 होते ते वाढून 2019 मध्ये 5 हजार 412 झाले. अपहरण आणि पळवून नेण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2017 मध्ये 6 हजार 248 गुन्ह्यांची नोंद झाली होती, ती वाढून 2019 मध्ये 8 हजार 382 झाली

विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा क्रमांक घसरला

कर्नाटक राज्य परदेशी गुंतवणुकीत अव्वल स्थानी आहे, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. देशात परदेशी गुंतवणूक कमी होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यात मात्र दुप्पट गुंतवणूक झाली आहे. मागील वर्षी परदेशी गुंतवणूक राज्यात 80 हजार 13 कोटी रुपयांची होती, तर यावर्षी ही गुंतवणूक अवघी 25 हजार 316 कोटी अपेक्षित आहे. मागील वर्षी परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर होता.

Maharashtra Economic Survey Report

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.