LIVE | आमदार प्रताप सरनाईक मुंबईत दाखल, संजय राऊतांसोबत दीड तास चर्चा

राज्या आणि देशातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि प्रत्येक अपडेटेड घडामोड फक्त एका क्लिकवर

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:25 PM, 24 Nov 2020
LIVE | आमदार प्रताप सरनाईक मुंबईत दाखल, संजय राऊतांसोबत दीड तास चर्चा

[svt-event title=”संपूर्ण शिवसेना प्रताप सरनाईकांच्या पाठिशी – संजय राऊत” date=”24/11/2020,5:26PM” class=”svt-cd-green” ] हे फक्त राजकीय प्रकरण आहे.. प्रताप सरनाईकांनी त्यांच्या भूमिका ठामपणे मांडल्या.. एका चॅनलविरोधात असो किंवा अन्वय नाईकप्रकरण असो, त्यामुळे ही मळमळ-जळजळ सुरु असावी. विरोधी आमदार-खासदारांना दडपशाही करण्याचा प्रयत्न असेल. आम्ही या महाष्ट्राची औलाद आहोत.. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत.. आम्ही शहीद होऊ महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी, पण यांच्यासमोर गुडघे टेकणार नाही.. हे प्रकरण त्यांनाही माहिती नाही. काही न करता असे ४०-५० लोक दिल्लीतून येतात आणि त्यांच्या मुलाला घेऊन जातात, फौजफाटा घेऊन येतात, ही झुंडशाही असून, यंत्रणेद्वारे आणीबाणी लावण्याचा प्रकार आहे.. [/svt-event]

[svt-event title=”आमदार प्रताप सरनाईक मुंबईत दाखल, संजय राऊतांसोबत दीड तास चर्चा ” date=”24/11/2020,5:20PM” class=”svt-cd-green” ] मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्यानंतर आज अखेर प्रताप सरनाईक मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी थेट शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीड तास चर्चा केली. या चर्चेत काय झालं हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. यावेळी संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत हे प्रताप सरनाईक यांच्यासोबत आहेत. [/svt-event]

[svt-event date=”24/11/2020,4:28PM” class=”svt-cd-green” ] सोशल मीडियावर धार्मिक तेढ वाढवणाऱ्या पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांना 8 जानेवारीपूर्वी पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. मुंबई पोलिसांनी 8 जानेवारी अगोदर कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात कारवाई करु नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात बांद्रा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   [/svt-event]

[svt-event title=”सोमेश्वर बालाजी मंदिराचा यंदाचा दीपोत्सव रद्द” date=”24/11/2020,8:38AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : सोमेश्वर बालाजी मंदिराचा यंदाचा दीपोत्सव रद्द, त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त साजरा केला जातो दीपोत्सव, हजारो नाशिककर दीपोत्सवात होतात सहभागी, यंदा मात्र कोरोना च्या पार्शवभूमीवर दीपोत्सव रद्द करण्याचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=” नाशिक जिल्ह्यातील दारु दुकानांवरील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात, उत्पादन शुल्क विभागाची माहिती देण्यास टाळाटाळ” date=”24/11/2020,8:24AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : जिल्ह्यातील 14 दारु दुकानांवरची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात, उत्पादन शुल्क विभागाची माहिती देण्यास टाळाटाळ, अवैध मद्यसाठा सापडल्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केली होती धडक कारवाई [/svt-event]

[svt-event title=”नाशिक उपनगरात गुंडांचा हैदोस, दहशत माजवण्यासाठी 11 गाड्यांच्या काचा फोडल्या ” date=”24/11/2020,8:15AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : उपनगरला गुंडांचा हैदोस, दहशत माजवत गुंडांनी फोडल्या 11 गाड्यांच्या काचा, तब्बल 11 गाड्यांच्या काचा फोडून देखील स्थानिक पोलीस अनभिज्ञ, उपनगर परिसरातील गुंडांचे थेट पोलिसांनाच आव्हानव, परिसरात भीतीचं वातावरण, नागरिकांना पोलिसांच्या कारवाईची प्रतीक्षा [/svt-event]

[svt-event title=”मराठवाडा पदवीधर निवडणुकीत कोरोना पॉझिटिव्हही करणार मतदान” date=”24/11/2020,8:13AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत कोरोना पॉझिटिव्हही करणार मतदान, मतदानासाठी आरोग्य विभागाकडून स्वतंत्र व्यवस्था, सायंकाळी चार ते पाच या वेळेत असणार मतदानाची सोय, आरोग्य विभाग रुग्णाला मतदान केंद्रावर नेवून करणार मतदान, पॉझिटीव्ह रुग्णाला मतदान करण्यासाठी असेल स्वतंत्र व्यवस्था [/svt-event]

[svt-event title=”यवतमाळ जिल्ह्यात 24 तासांत चार शेतकऱ्यांची आत्महत्या, कर्जबाजारी आणि नापिकीमुळे विदर्भातील शेतकरी हतबल” date=”24/11/2020,8:10AM” class=”svt-cd-green” ] यवतमाळ : कर्जबाजारी आणि नापिकीमुळे विदर्भात वाढत आहेत शेतकरी आत्महत्या, यवतमाळ जिल्ह्यात 24 तासांत चार शेतकऱ्यांची आत्महत्या, विदर्भात शेतकऱ्यांचं खरिपातील कापूस आणि सोयाबीन पिकं गेली, दोन्ही पिकं गेल्याने शेतकरी झाले हवालदिल, एकट्या यवतमाळ जिल्ह्यात पाच दिवसांत सहा शेतकरी आत्महत्या, यंदाच्या नापिकीमुळे विदर्भात येत्या काळात शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती [/svt-event]

[svt-event title=”पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या केंद्र विभागणीत गोंधळ, मतदारांना घरापासून 16 किलोमीटरच्या परिसरातील मतदान केंद्र ” date=”24/11/2020,7:51AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या केंद्र विभागणीत गोंधळ, शिक्षक असलेल्या मतदारांसाठी एकाच केंद्रावर मतदान करण्याची व्यवस्था करण्याऐवजी अनेकांना दोन वेगवेगळी केंद्र देण्यात आलीत, तर काही मतदारांना घरापासून किमान 16 किलोमीटरच्या परिसरातील मतदान केंद्र दिले असल्याने मतदानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे राजकारण तापणार” date=”24/11/2020,7:51AM” class=”svt-cd-green” ] पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे राजकारण तापणार, 31 डिसेंबरनंतर 30 हजार 820 हजार संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची तयारी सुरु, त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 5629 जणांचे पॅनल मंजूर करण्यात आहे आहे, टप्प्याटप्प्याने या निवडणुका घेण्यात येणार आहेत, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 31 डिसेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती, प्रलंबित असलेल्या 45 हजार 276 सहकारी संस्थांपैकी क आणि ड वर्गातील संस्थांच्या निवडणुका होणार, सहकार आयुक्त जगदीश पाटील यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=” उपसरपंच पदाची साडे दहा लाख रुपयांत विक्री, नांदेडच्या महाटी गावातील धक्कादायक प्रकार” date=”24/11/2020,7:47AM” class=”svt-cd-green” ] नांदेड : उपसरपंच पदाची साडे दहा लाख रुपयांत विक्री, मुदखेड तालुक्यातील महाटी गावातील धक्कादायक प्रकार, गावातील सरपंच पद ओबीसीसाठी झालंय राखीव, त्यामुळे गावावर सत्ता रहावी यासाठी लिलाव करत लावल्या बोली, लोकशाहीची क्रूर चेष्टा करणारा व्हीडिओ व्हायरल [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात पाचव्या दिवशीही कोरोना रुग्णवाढ कायम, प्रशासनाची चिंता वाढली” date=”24/11/2020,7:42AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर जिल्ह्यात पाचव्या दिवशीही कोरोना रुग्णवाढ कायम, जिल्ह्यात 24 तासांत 357 नवे रुग्ण, 10 जणांच्या मृत्यूची नोंद, जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 7335 चाचण्या, कोरोना चाचण्यांच्या तुलनेत 4.86 टक्के पॅाझिटीव्ह येण्याचं प्रमाण, जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 9 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील आनंद साई अर्बन क्रेडिट सोसायटीत 13 कोटींचा घोटाळा ” date=”24/11/2020,7:35AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरातील आनंद साई अर्बन क्रेडिट सोसायटीत 13 कोटींचा घोटाळा, संचालक मंडळाने अपहार करुन गुंतवणूकदारांना लावला गंडा, आनंद अर्बन सोसायटीत नियमबाह्य कर्जवाटप आणि व्यवहार, अंकेक्षण अहवालाच्या आधारे गुन्हा नोंदवण्याची शिफारस, पदाधिकाऱ्यांची प्रॅापर्टी विकून पैसे वसूलीची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात अग्निशमनची गाडी दिली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जळलेला ऊस नगरपरिषद इमारतीत फेकला ” date=”24/11/2020,7:31AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : अग्निशमनची गाडी दिली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जळलेला ऊस फेकला नगरपरिषद इमारतीत, कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड नगरपरिदेतील घटना, मुरगुड मधील दत्त मंदिर शेजारील शेतकऱ्यांच्या 30 एकर उसाला रविवारी रात्री लागली होती आग, मात्र आग विझवण्यासाठी नगरपालिकेची गाडी बोलावली असता देण्यात आली उडवाउडवीची उत्तरं, इतर संस्थांच्या अग्निशमन गाड्यां बोलावून विझवावी लागली आग, सहा तासांच्या प्रयत्नानंतर विझवली आग, शेतकऱ्यांच 25 लाखांच नुकसान [/svt-event]

[svt-event date=”24/11/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]