LIVE | नांदेडमध्ये ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू, आत्महत्येची शक्यता

LIVE | नांदेडमध्ये ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू, आत्महत्येची शक्यता

महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

Nupur Chilkulwar

|

Dec 04, 2020 | 9:50 AM

[svt-event title=”नांदेडमध्ये ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू, आत्महत्येची शक्यता” date=”04/12/2020,9:47AM” class=”svt-cd-green” ] नांदेड : ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू, नांदेडमध्ये मध्यरात्री घडली घटना, मृत हा वेडसर असून त्याने आत्महत्या केली असावी अशी माहिती पोलिसांनी दिली, शहरातून अवजड वाहनांना बंदी असताना भरधाव वेगाने वाहने जात आहेत, त्यामुळे तरोडा नाका ते मालेगाव हा रोड मृत्यूचा सापळा बनला, रात्री अपघाताची ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला [/svt-event]

[svt-event title=”वसई वालीव नाक्यावर भीषण आग, आजूबाजूचे 6 दुकाने जळून खाक” date=”04/12/2020,9:36AM” class=”svt-cd-green” ] वसई : वालीव नाक्यावर रात्री 1 च्या सुमारास भीषण आग, या आगीत आजूबाजूचे 6 दुकाने जळून खाक झाली, यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही, वालीव नाक्यावरील मोबाईल, चप्पल, फरसाण आणि स्वीट मार्टची दुकान जळून खाक झाली, वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून, दुकानाचे शटर तोडून आग पूर्णपणे विझवली, या घटनेत अग्निशमन दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे मोठी आपत्तीजनक घटना टळली [/svt-event]

[svt-event title=”बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीचं जागरण-गोंधळ करत ठिय्या आंदोलन” date=”04/12/2020,9:35AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : केंद्र सरकारच्या शेतकरी विधेयकाला विरोध आणि दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री जागरण-गोंधळ करीत ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकारी कचेरीसमोर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पहाटे 5 वाजेपर्यंत जागरण आंदोलन करत ठिय्या घातला, यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साडे दहा वाजता ऑल पार्टी मीटिंग बोलावलेली” date=”04/12/2020,9:31AM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साडे दहा वाजता ऑल पार्टी मीटिंग बोलावलेली, ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यात होणाऱ्या लसीकरणाच्या घोषणेनंतर ही बैठक असल्याने देशात लसीकरणाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी बैठक असावी अशी शक्यता आहे [/svt-event]

[svt-event date=”04/12/2020,9:15AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें