AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 531 वर, दोन दिवसात 74 पोलीस कोरोनाग्रस्त

राज्यात पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ होत (Maharashtra Police Corona Positive Patient) आहे.

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 531 वर, दोन दिवसात 74 पोलीस कोरोनाग्रस्त
| Updated on: May 07, 2020 | 1:28 PM
Share

मुंबई : राज्यात पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ होत (Maharashtra Police Corona Positive Patient) आहे. आज (7 मे) एका दिवसात 36 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 531 वर पोहोचला आहे. तर दुर्देवाने एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीसही अहोरात्र मेहनत घेत (Maharashtra Police Corona Positive Patient) आहेत. मात्र हेच पोलीस कोरोनाच्या कचाट्यात येत आहेत. अनेक पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. आज (7 मे) 36 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काल (6 मे) 38 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. गेल्या दोन दिवसात राज्यातील 74 पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 531 वर पोहोचला आहे. यात 51 अधिकाऱ्यांना आणि 480 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात कोरोनाची लक्षण आढळणाऱ्या सर्वाधिक पोलिसांचा समावेश आहे. राज्यातील जवळपास 43 अधिकारी आणि 444 पोलीस कर्मचारी अशा एकूण 487 पोलिसांना कोरोनाची लक्षण दिसून आली आहेत.

सुदैवाने आतापर्यंत 39 कोरोनाबाधित पोलिसांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात 8 अधिकारी आणि 31 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

संचारबंदी काळात 18 हजार व्यक्तींना अटक

राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. देशात 22 मार्चपासून हा लॉकडाऊन सुरु झाला आहे. लॉकडाऊनचा आजचा 48 वा दिवस आहे. तेव्हा आतापर्यंत राज्यात कलम 188 नुसार 96 हजार 231 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 18 हजार 858 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच 53 हजार 330 वाहन जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांवर हल्ले करणाऱ्या 683 जणांना अटक

संचारबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. जवळपास 189 ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले आहे. यात 683 हल्लेखोर नागरिकांना अटक केली आहे. कालही पाच ठिकाणी पोलिसांवर हल्ले करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या हल्ल्यात 73 पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड गंभीर जखमी झाले आहेत. त्याशिवाय अवैध वाहतूक करणाऱ्या 1281 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कालावधीत आरोपींकडून 3 कोटी 56 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे

राज्यभरात पोलिसांनी हातावर क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या 649 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवल आहे. काल 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं (Maharashtra Police Corona Positive Patient) आहे.

संबंधित बातम्या :

एका दिवसात तब्बल 38 पोलिसांना कोरोना, राज्यातील 495 पोलीस कोरोनाग्रस्त

सोलापुरात कोरोनाविरोधात लढताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

Follow Us
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.