कठोर नियम करा, पण महाराष्ट्रातील मंदिरं उघडा, ब्राह्मण महासंघाची मागणी

नियम कठोर करून राज्यातील मंदिरे उघडावेत, अशी मागणी ब्राह्मण महासंघांचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी (Mahrashtra Temple reopen again) केली आहे.

कठोर नियम करा, पण महाराष्ट्रातील मंदिरं उघडा, ब्राह्मण महासंघाची मागणी
Follow us
| Updated on: Jun 11, 2020 | 6:16 PM

पुणे : महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील सर्व प्रसिद्ध मंदिरं उघडली आहेत. मात्र महाराष्ट्रातील मंदिरं अद्याप कुलूप बंद आहेत. मंदिरे हे सुद्धा लाखो लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे कठोर नियम करा पण राज्यातील मंदिरे उघडा, अशी मागणी ब्राह्मण महासंघानं केली आहे. (Mahrashtra Temple reopen again)

देशभरातील प्रसिद्ध शबरीमला, बालाजी, वैष्णवदेवी, केदारनाथ, गंगा स्नान अशी मोठी देवस्थाने चालू झाली आहेत. माञ महाराष्ट्रातीली मंदिर अद्याप बंद आहेत. त्यामुळे नियम कठोर करून राज्यातील मंदिरे उघडावेत, अशी मागणी ब्राह्मण महासंघांचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.

मानवी आयुष्याचे महत्व आणि किंमत आम्ही पण जाणतो. माञ धोका पत्करून सध्या 80 ते 90 टक्के व्यवहार चालू झाला आहे. मग फक्त मंदिरे बंद ठेवून काय फरक पडणार आहे, असा सवालही ब्राह्मण महासंघाने केला आहे.

राज्यातील मंदिरे ही लाखो लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. केवळ पुजारी, गुरव, जंगम, हारवाले, प्रसाद विकणारे, छोटे मोठे दुकानदार, विक्रेते, अगदी पार्किंगपासून ते सुरक्षारक्षकपर्यंत अनेक लोक घरी बसून आहेत. त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की, तुम्ही हवं तर कठोर नियम करा. पण सर्वच देवस्थानं खुली करा.

संकट काळात देव दर्शनामुळे मिळणारी मानसिक शांती महत्त्वाची असते. त्यामुळे यासंदर्भात लवकरच गृहमंत्री आणि पुणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊ, अशी माहिती ब्राह्मण महासंघांचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी दिली.  (Mahrashtra Temple reopen again)

संबंधित बातम्या : 

ऑफिस, हॉटेल, रेस्टॉरन्ट, धार्मिक स्थळं 8 जूनपासून सुरु होणार, गृहमंत्रालयाकडून नियमावली जाहीर

मिशन बिगीन अगेन | तिसरा टप्पा सुरु, कोणती बंधने कायम, कोणत्या नियमांना शिथिलता?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.