mumbai power cut ! मुंबई-ठाण्याला विजेचा झटका, रेल्वे, इंटरनेट ठप्प; रुग्णालयांनाही फटका

मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असून जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात येत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:43 AM, 12 Oct 2020
mumbai power cut ! मुंबई-ठाण्याला विजेचा झटका, रेल्वे, इंटरनेट ठप्प; रुग्णालयांनाही फटका

मुंबई: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. तसेच इंटरनेटही बंद झाल्याने मुंबई-ठाण्यातील कामं ठप्प झाली आहे. मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असून जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात येत आहेत. (Major power failure across Mumbai, Thane, Panvel; train lines affected)

मुंबई-ठाण्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने इंटरनेटही बंद झालं. त्या सरकारी आणि खासगी कार्यालयातील काम ठप्प झालं. तर इंटरनेट ठप्प झाल्यामुळे मोबाईलमधून मेसेजही जात नव्हते. सोशल मीडियाही अचानक ठप्प झाल्याने मुंबईकर थोडावेळ गोंधळून गेले होते. दुसरीकडे वीज गेल्याने कार्यालयातील कर्मचारी कार्यालयाबाहेर आले होते. तर, रुग्णालयांमध्येही वीज नसल्याने तात्काळ जनरेटर सुरू करून विद्यूत पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र काही छोट्या रुग्णालयांमध्ये जनरेटर नसल्याने या रुग्णालयांमध्ये काळोख झाला होता. वीज गेल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाचाही खोळंबा झाला.

मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका केवळ सरकारी कार्यालयांनाच बसला नसून त्याचा मुंबई लोकलवरही मोठा परिणाम झाला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने मध्य, सेंट्रल आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक जागच्या जागी ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांना लोकलमध्येच खोळंबून राहिले.  (Major power failure across Mumbai, Thane, Panvel; train lines affected)

मुंबईत कोणकोणत्या भागात वीज गायब?

दादर
लालबाग
परळ
प्रभादेवी
वडाळा
ठाणे
नवी मुंबई
पनवेल
बोरिवली
मालाड
कांदिवली
पेण
पनवेल
उरण
कर्जत
खालापूर

बत्ती गुल, सर्व काही जागच्या जागी थांबलं

मुंबईची बत्ती गुल झाल्यामुळे सर्व काही जागच्या जागी थांबलं. वीजेअभावी रेल्वेच्या तिन्ही लाईन ठप्प झाल्या. तीनही मार्गावरील लोकल आहे त्या ठिकाणी थांबल्या. नेमक्या लोकल का थांबल्या हे प्रवाशांनाही काहीवेळ समजत नव्हतं.

संबंधित बातम्या:

Mumbai Power Cut: मुंबईची बत्ती गुल; कार्यालये आणि रेल्वे वाहतूक ठप्प

Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल

 

(Major power failure across Mumbai, Thane, Panvel; train lines affected)