लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न

पुण्यातील चाकण परिसात एका अजब लग्नाची गोष्ट समोर आली आहे. लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं थेट आयसीयूमध्ये लग्न लावून देण्यात आलं.

लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न

पुणे : पुण्यातील चाकण परिसात एका अजब लग्नाची गोष्ट समोर आली आहे. लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं थेट आयसीयूमध्ये (Marriage in ICU of hospital) लग्न लावून देण्यात आलं. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने (Marriage in ICU of hospital) आत्महत्येचे प्रयत्न केला. या प्रयत्नात मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तरुणीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. त्यावेळी सामाजिक संघटनेने संबंधित प्रियकराला शोधून त्याला रुग्णालयात आणलं आणि त्याची लगीनगाठ बांधण्यात आली.

हे लग्न झाल्यानंतर संबंधित तरुण पळून गेला आहे. त्यामुळे तरुणीच्या नातेवाईकांनी त्याच्याविरोधात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचं नाव सूरज आहे. आरोपीने पीडित तरुणीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केल्याचा आरोप आहे. मात्र मुलीने लग्नासाठी आग्रह केल्यानंतर जातीचं कारण देत मुलाने नकार दिला.

त्यानंतर मुलीने 27 नोव्हेंबरला सूरजच्या घरासमोर जाऊन विष प्राशन केलं. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मुलीची प्रकृती बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर मुलाला शोधून काढून दोघांचं आयसीयूमध्ये लग्न लावण्यात आलं. मात्र लग्नानंतर आता आरोपी तरुण पळून गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Published On - 4:10 pm, Fri, 6 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI