व्हॉट्सअॅप फोटोवरुन प्रवाशाने बॅग ओळखली, सहा लाखांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद

धावत्या रेल्वेत आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे सामान चोरणारी सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे

व्हॉट्सअॅप फोटोवरुन प्रवाशाने बॅग ओळखली, सहा लाखांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद
Follow us
| Updated on: Feb 05, 2020 | 1:49 PM

मनमाड : पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवल्यानंतर प्रवाशाने आपली चोरीला गेलेली बॅग ओळखली आणि अवघ्या काही तासांत सहा लाखांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद झाली. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या चोरीचा थरारक पर्दाफाश (Manmad Bag Ornaments Theft)  झाला.

विदर्भ एक्स्प्रेसमधून रोख रकमेसह तब्बल सहा लाखांचे दागिने असलेली बॅग लंपास करणाऱ्या टोळीला मनमाड रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने जेरबंद केलं. तिघा आरोपींची धरपकड करण्यात पोलिसांना यश आलं, तर दोन आरोपी फरार आहेत. अटकेतील आरोपींमध्ये चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफाचाही समावेश आहे.

आरोपीकडून विदर्भ एक्स्प्रेसमधून चोरण्यात आलेली बॅग जप्त करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने या आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

धावत्या रेल्वेत आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे सामान चोरणारी सराईत गुन्हेगारांची ही टोळी असून त्यांनी कुठे-कुठे आणखी किती चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास केला जात असल्याचं रेल्वे पोलिस निरीक्षक एन. के. मदने यांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील बोरिवलीत राहणारे संजय श्रीपाद हातवळणे आपल्या कुटुंबीयांसोबत वर्ध्याहून विदर्भ एक्स्प्रेसच्या एस-6 या आरक्षित डब्यातून मुंबईला जात होते. त्यांनी आपल्या सर्व बॅगा सीटखाली ठेवल्या होत्या. त्यातील एका बॅगेत रोख रकमेसह सहा लाख आठ हजार रुपये किमतीचे दागिने होते.

गाडी मनमाडला आल्यानंतर हातवळणे यांच्या मुलीला जाग आली. तिने सामानाची तपासणी केली असता, दागिने असलेली बॅग तिला दिसली नाही. त्यामुळे तिने लगेच हा प्रकार वडिलांच्या कानावर घातला. मात्र तोपर्यंत गाडीने रेल्वे स्टेशन सोडलं होतं.

संजय हातवळणे यांनी मनमाड रेल्वे पोलिस स्टेशनशी संपर्क करुन घडलेली घटना सांगितली. ‘तुम्ही पुढच्या पोलिस स्थानकात तक्रार दाखल करा. आम्ही इकडे तपास सुरु करतो’ असं पोलिस निरीक्षक मदने यांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर हातवळणेंनी आरपीएफ ठाणे गाठलं आणि आरपीएफ इन्स्पेक्टर के. डी. लकडा यांना घटनेची माहिती दिली.

दोघांनी कंट्रोल रुममध्ये जाऊन सीसीटीव्ही तपासले असता एक संशयित व्यक्ती बॅग घेऊन जाताना त्यांना दिसली. त्याच्या बॅगेचा फोटो पोलिसांनी संजय हातवळणेंना व्हॉट्सअॅपवर पाठवला. तेव्हा ही आपलीच बॅग असल्याचं त्यांनी सांगितलं.

पोलिसांनी दोन पथकं करुन सापळा रचला आणि अवघ्या काही तासात त्यांना आरोपींना शोधण्यात यश आलं. या प्रकरणी पोलिस आणि आरपीएफ यांनी संयुक्त कारवाई करत संजय सुखदेव कापसे (रा. तामसवाडी, निफाड), संदीप बबन वानखेडे (रा. नागरदास, वाशिम) यांच्यासोबत एका सराफाला ताब्यात घेतलं.

त्यांच्याकडून चोरलेली बॅग आणि त्यातील मुद्देमाल जप्त केला. त्यांचे आणखी दोन साथीदार फरार झाले आहेत. रेल्वे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि 397/34, 411 आणि भारतीय रेल्वे कायद्याच्या 137, 147 अन्वये गुन्हा दाखल (Manmad Bag Ornaments Theft) केला आहे.

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.