AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देवेंद्र फडणवीसांशी मी बोलत नाही, पण शेतकऱ्यांसाठी फोन करणार’, मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांना या परिस्थतीत सरकारकडून मदतीची आस आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील याबाबत राज्य सरकारचे कान टोचले आहेत. तसेच राज्य सरकारही प्रशासकीय पातळीवर काम करत आहे. पण नुकसानग्रस्त भागांची लवकरात लवकर पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत […]

'देवेंद्र फडणवीसांशी मी बोलत नाही, पण शेतकऱ्यांसाठी फोन करणार', मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील
| Updated on: Sep 04, 2024 | 10:05 PM
Share

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांना या परिस्थतीत सरकारकडून मदतीची आस आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील याबाबत राज्य सरकारचे कान टोचले आहेत. तसेच राज्य सरकारही प्रशासकीय पातळीवर काम करत आहे. पण नुकसानग्रस्त भागांची लवकरात लवकर पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी सर्वत्र केली जात आहे. या दरम्यान, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. राज्य सरकारने तातडीने मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करु, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मनोज जरांगे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागांची पाहणी केली. यानंतर त्यांनी भूमिका मांडली. “देवेंद्र फडणवीसांशी मी बोलत नाही. पण शेतकऱ्यांसाठी फोन करणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधार दिला नाही तर शेतकऱ्यांना घेवून रस्त्यावर उतरणार”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. “शेतकऱ्यांना तातडीने मदत करा आणि कर्जमाफी द्या”, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

‘मी सगळ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतोय’

“शेतकऱ्यांसाठी मी सगळ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतोय. निसर्गात आमचं आयुष्य वाहून गेलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावतोय. फडणवीसांना आताच फोन करणार आहोत. उद्याच्या कॅबिनेटमध्ये नुकसानग्रस्तांना मदतीसाठी जास्तीची तरतुद करा. आमचेही दोन माणसं फोन लावत आहेत. विदर्भातील प्रश्न मी सांगणार आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“शेतकऱ्याला कधीही जात नसते. व्याजानं आणून त्यांनी घेतलेले आहेत. लेकराच्या बरोबरीनं त्यांनी पीक जपलं आहे. कधीही संकट आलं तरी खचून जावू नका. तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नका. मी काही राजकारणी माणूस नाही. मला नाटकबाजी जमत नाही. काल मी पुणे जिल्ह्यात होतो. शेतकऱ्यांचे आम्ही पोरं आहोत. एकानेही खचून जावून टोकाचं पाऊल उचलू नका”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांना केलं.

“जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलणार आहे. दिवसरात्र काम केल्यानंतर अशी घटना घडली. शेतकऱ्यांच्या वेदना कळतात. आम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहोत, आम्ही पूर्ण माहिती घेवून काम करतोय. आपण स्वत: अर्ज तयार करा. जिल्हाधिकाऱ्यांकडे नेवून द्या. तुमची आम्हाला खूप गरज आहे. खूप कुटुंब उघडे पडलेल आहेत”, अशी भावना मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.