मराठा समाजाचा मशाल मोर्चा, 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार

नुकत्याच झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. (Maratha Community  Mashal march at Matoshree) 

  • हेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 15:24 PM, 1 Nov 2020
मराठा समाजाचा मशाल मोर्चा, 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार

मुंबई : मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. येत्या 7 नोव्हेंबरला मराठा मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर धडकणार आहे. मराठा समाजाकडून मशाल मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. (Maratha Community  Mashal march at Matoshree)

मराठा आरक्षणावरुन राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जातं आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाकडून आज मुंबईत मराठा संघर्ष यात्रा पार पडली. यावेळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यात संघर्ष यात्रा पार पडली.

राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा काळ मशाल मार्चने गाजण्याची चिन्हे आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या 7 नोव्हेंबरला मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मशाल मार्च नेला जाणार आहे. अशा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

मराठा आरक्षण ही मोर्चाची महत्त्वाची मागणी असल्याने या अनुषंगाने प्रमुख मागण्या बैठकीत मांडण्यात आल्या.  मराठा समाजावर अन्याय करणारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेली संपूर्ण उपसमिती बरखास्त करून नवीन समिती बनवली जावी. या नव्या समितीत विरोधी पक्षाचा पण समावेश करावा.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठाच्या निर्मितीसाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. मराठा तरुणांच्या नोकऱ्या, विद्यार्थ्यांचे ॲडमिशन सुरक्षित करावेत, या प्रमुख तीन मागण्या करण्यात आल्या.  (Maratha Community  Mashal march at Matoshree)

संबंधित बातम्या : 

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल

विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेला भाजपचं समर्थन, ‘त्या’ जागा बाजूला ठेवून नोकरभरतीची मागणी