मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, महाविकास आघाडीतील पहिल्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यात आज पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. (Maratha Morcha demands Vijay Wadettiwars resignation)  

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, महाविकास आघाडीतील पहिल्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : मराठी क्रांती मोर्चाने सारथी संस्थेवरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आणली असून, वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली. पुण्यात आज पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. (Maratha Morcha demands Vijay Wadettiwars resignation)

मराठा क्रांती मोर्चाचे तुषार काकडे, “मागील सरकारने आमच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य केल्या होत्या. विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करतोय. सारथीची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. विजय वडेट्टीवार मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनावेळी जो शब्द दिला होता,तो सरकारने पाळावा”

याशिवाय विद्यार्थ्यांचे विद्यावेतन रखडले आहे. विजय वडेट्टीवार या खात्याला न्याय देऊ शकत नाहीत. सारथी संस्थेची छळवणूक सुरु आहे. विजय वडेट्टीवार यांनी या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भेदभाव केला जात आहे, असा आरोपही यावेळी केला.

विजय वडेट्टीवार यांच्याकडून कार्यभार काढून दुसऱ्या कार्यक्षम मंत्र्यांकडे कार्यभार दिला जावा, अशी मागणी यावेळी मराठा मोर्चाकडून करण्यात आली. तसंच मराठा क्रांती मोर्चा वडेट्टीवार यांचा निषेध करतोय, मराठा आरक्षणाबाबत उद्याच्या कोर्टाच्या निकालात काही दगाफटका झाला तर आम्ही सरकारला धडा शिकवू, आंदोलनाची वेळ आमच्यावर आणू नका, असा इशारा यावेळी देण्यात आला.

काही दगाफटका झाला तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याची जबाबदारी सरकारची असेल, विजय वडेट्टीवार यांनी याला राजकीय रंग देऊ नये, असा आक्रमक पवित्रा मराठा मोर्चाने घेतला.

सारथी संस्था बंद पडू देणार नाही : विजय वडेट्टीवार

सारथी संस्था चालेल. मराठा विद्यार्थ्यांच्या उद्दीष्ट्येपूर्तीसाठी ही संस्था चालेल. मात्र, काही मंडळी राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचा प्रयत्न केला जातोय. यामागे कोण आहे? ते मी नंतर बोलेल.

पाहा : स्पेशल रिपोर्ट : ‘सारथी’च्या गैरव्यवहारात कारवाई कधी?

सध्या शासनाकडे पैसे नाहीत. थकबाकी आहे, पैसे आम्ही मागेपुढे देत आहोत. पण स्कॉलरशिप थांबवली, बंदच केलं, अशाप्रकारे काही लोकांनी त्रागा केला. त्यामध्ये तथ्य नाही. फेलोशिप सुरु राहील. विद्यार्थ्यांचा 5 वर्षांचा कोर्स पूर्ण होईल.

500 विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचा दरमहा 31 हजार रुपये खर्च राज्य सरकार करत आहे. हा खर्च पाच वर्ष करायचा आहे. या फेलोशिपमध्ये पाच वर्षात 22 लाख रुपये एका विद्यार्थ्यायासाठी खर्च होणार आहे. तरीही आम्ही बंद पाडणार नाही

(Maratha Morcha demands Vijay Wadettiwars resignation)

संबंधित बातम्या 

EXCLUSIVE | कर्मचाऱ्यांची पगार कपात होणार नाही – मंत्री विजय वडेट्टीवार   

‘सारथी’चा पंख छाटण्याचा प्रयत्न, सरकारने दुटप्पी भूमिका सोडावी, संभाजीराजे आक्रमक   

सारथीतील गैरव्यवहाराची चौकशी होणार : विजय वडेट्टीवार   

‘सारथी’साठी 23.66 कोटी मंजूर, 21.5 कोटी अन्यत्र खर्च, अनियमिततेच्या अहवालात धक्कादायक माहिती 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI