मराठा क्रांती मोर्चाचं मोठं पाऊल, मुख्यमंत्र्यांकडे पोहोचलं रक्ताने सह्या केलेलं पत्र

मराठा आरक्षणासाठी थेट मुख्यमंत्र्यांना रक्ताच्या सह्याचं पत्र लिहिण्यात आल्याची माहिती समोर येत आहेत

मराठा क्रांती मोर्चाचं मोठं पाऊल, मुख्यमंत्र्यांकडे पोहोचलं रक्ताने सह्या केलेलं पत्र
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 9:45 AM

औरंगाबाद : मराठा आरक्षणासंबंधी कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे राज्यात वातावरण आणखी चिघळताना दिसत आहे. आतापर्यंत तीव्र आंदोलनाचा इशारा देणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आणखी कठोर पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी थेट मुख्यमंत्र्यांना रक्ताच्या सह्याचं पत्र लिहिण्यात आल्याची माहिती समोर येत आहेत. (Maratha Kranti Morcha sent letter to cm uddhav thackeray which written by blood)

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी पत्र लिहून त्यावर प्रत्येकाने आपल्या रक्ताने सह्या केल्या आहेत. रक्ताच्या साह्य करून हे पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील समन्वयकांनी हे पत्र लिहलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणावरून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. अशात, खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी “जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करण्यासारखी स्थिती नाही”, असा टोला लगावला होता, त्यावरून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रत्युत्तर देत माफीची मागणी करण्यात आली आहे. (Maratha Kranti Morcha sent letter to cm uddhav thackeray which written by blood)

“संजय राऊत तुम्हाला एकच इशारा आहे, दरवेळी तुम्ही ‘सामना’च्या अग्रलेखातून आमच्या समाजाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना टार्गेट करता, आम्ही हे खपवून घेणार नाही. तुम्ही ताबडतोब माफी मागा. जर माफी न मागता तुम्ही मराठवाड्यात आलात तर मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही”, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पंकज जऱ्हाड यांनी दिला.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षणाबाबत बोलताना म्हणाले होते की, ‘एक राजे बिनडोक आहेत, तर दुसऱ्या राजांचे आरक्षण सोडून वेगळेच काहीतरी चालले आहे. याबाबत सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालविण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही.

यावरून आता मराठा क्रांती मोर्चा, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे भोसले यांचे चाहते संतप्त झाले असून अनेक जण संजय राऊतांना प्रत्युत्तर देत आहेत, त्यात आता मुख्यमंत्र्यांनाही रक्ताच्या सह्या करत पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे यावर राज्य सराकरकडून आणि खासकरून मुख्यमंत्र्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

इतर बातम्या –

शनिवारपर्यंत राज्यावर असणार आसमानी संकट, हवामान खात्याचा इशारा

सावधान! मेंदूत जळजळ झाल्यास गंभीर; कोरोनाचं समोर आलं धक्कादायक लक्षणं

(Maratha Kranti Morcha sent letter to cm uddhav thackeray which written by blood)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.