गोळ्या घातल्या तरी चालेल, पण घराबाहेर पडू देणार नाही, मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मराठा क्रांती ठोक मोर्चाने 42 मराठा कुटुंबांचा प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणी केली आहे (Maratha Kranti Thok Morcha warn Uddhav Thackeray).

गोळ्या घातल्या तरी चालेल, पण घराबाहेर पडू देणार नाही, मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या 42 कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करु, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे (Maratha Kranti Thok Morcha warn Uddhav Thackeray). त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि त्या प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी केली.

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं, “मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाच्या 42 बांधवांनी बलिदान दिले. या प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख आणि कुटुंबातील प्रत्येकी एकाला नोकरीचं आश्वासन दिले होतं. मात्र, या आश्वासनाची अजूनही पूर्तता झाली नाही. 2018 मध्ये आझाद मैदानात प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, मराठा समाजाचा केवळ राजकारणासाठी वापर होत आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“30 जुलैला बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आलं. मात्र आता कोणतीही बैठक, चर्चा न करता 42 जणांना नोकरीवर घ्यावं, अशी आमची मागणी आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नाही. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 ऑगस्टला मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा आणि मातोश्रीसमोर उपोषणाला बसू. त्यांना घराबाहेरही पडू देणार नाही. आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल,” अशी आक्रमक भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतली आहे.

‘बैठक चर्चा नको, मागण्या मान्य करा’

मराठी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आता बैठक चर्चा नको, मागण्या मान्य करा, अशी थेट भूमिका घेती आहे. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना बैठकीला बोलावलं. मात्र आम्ही कोणीही या बैठकीला जाणार नाही. मागण्या मान्य न केल्यास 9 ऑगस्टला क्रांती दिनी थेट आंदोलन केलं जाईल. अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलन करु. ही महाविकास आघाडी नसून महाभकास आघाडी आहे. समाजातील काही लोकांना हाताशी धरुन समाजाच्या मतासाठी वापर होतो आहे.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत असताना यांना राम मंदिर भूमिपूजनाचं पडलं आहे. यांचा एकही मंत्री रस्त्यावर फिरु देणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी शिवस्मारक भूमिपूजन केलं. मात्र हे काम अगोदर करा, असं या आंदोलकांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

शिवसेनेला उपरती झाली, तर ते येतील, भाजपने हात पुढे केला असे अर्थ काढू नका : चंद्रकांत पाटील

राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार : चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी रस्त्याचे भूमिपूजन थांबवावे, आम्ही राम मंदिर थांबवू : सुजय विखे

Maratha Kranti Thok Morcha warn Uddhav Thackeray

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI