राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी रस्त्याचे भूमिपूजन थांबवावे, आम्ही राम मंदिर थांबवू : सुजय विखे

राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन अहमदनगरमधील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी रस्त्याचे भूमिपूजन थांबवावे, आम्ही राम मंदिर थांबवू : सुजय विखे
Follow us
| Updated on: Jul 28, 2020 | 9:32 AM

अहमदनगर : “राष्ट्रवादीचे नेते, आमदार, मंत्री यांनी रस्त्यांची भूमिपूजन आणि उद्घाटन करणे थांबवावे, आम्ही राम मंदिराचे भूमिपूजन थांबवू” असे थेट आव्हान भाजप खासदार सुजय विखे यांनी दिले आहे. (BJP MP Sujay Vikhe taunts NCP Leader Ministers challenge over Ayodhya Ram Mandir Temple Issue)

राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन अहमदनगरमधील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला. “राष्ट्रवादीचे कित्येक आमदार आणि मंत्री दररोज वेगवेगळ्या रस्त्यांचे भूमिपूजन, उद्घाटन करतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे त्यांनी भूमिपूजन थांबवावी मग आम्ही देखील थांबू, असे सुजय विखे म्हणाले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“राम मंदिर आपल्या देशाच्या आस्थेचा प्रश्न असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला सल्ला देण्यापेक्षा उद्घाटनासाठी गर्दी जमवत असलेल्या नेत्यांना नियंत्रणात आणावे” असा टोला सुजय विखे यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोदी सरकारला आर्थिक नुकसानाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचा सल्ला सोलापूर दौऱ्यात दिला होता. “आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असं ते म्हणाले होते.

हेही वाचा : शरद पवार जे बोलले तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा, शिवसेनेचं हिंदुत्व जगजाहीर : प्रताप सरनाईक

दरम्यान, राम मंदिराचे भूमिपूजन हा इतर सण-उत्सवांसारखा दरवर्षी येणारा उत्सव नाही. त्यामुळे राम मंदिराला धर्माशी जोडण्याचे कारण नाही. असा सल्ला सुजय विखे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना दिला.

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. पुढील बुधवार अर्थात 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत हा सोहळा होणार आहे. मोदी सकाळी 11:30 वाजता अयोध्येत पोहोचून भाषण करतील. या ठिकाणी 200 पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास दोन तास हा कार्यक्रम चालणार आहे.

(BJP MP Sujay Vikhe taunts NCP Leader Ministers challenge over Ayodhya Ram Mandir Temple Issue)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.