विवाहित महिला ‘लिव्ह इन’मधील महिलांपेक्षा अधिक सुखी, संघाशी निगडीत संस्थेच्या सर्व्हेचं निरीक्षण

अनिश बेंद्रे

Updated on: Sep 22, 2019 | 2:56 PM

पुण्यातील 'दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रा'ने केलेल्या सर्वेक्षणानुसार विवाहित महिला या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांच्या तुलनेत अधिक सुखी असतात.

विवाहित महिला 'लिव्ह इन'मधील महिलांपेक्षा अधिक सुखी, संघाशी निगडीत संस्थेच्या सर्व्हेचं निरीक्षण
Mohan Bhagwat

मुंबई : विवाहित महिला या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Married Women Happiness Index) राहणाऱ्या महिलांच्या तुलनेत अधिक सुखी असतात, असं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत एका संघटनेने या संदर्भात सर्व्हे केलेला आहे.  सरसंघचालक मोहन भागवत येत्या मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध करणार आहेत.

पुण्यातील ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रा’ने केलेल्या सर्वेक्षणानंतर राजस्थानमधील पुष्करला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित सर्वेक्षणावर चर्चाही झाल्याची माहिती आहे. सर्वेक्षणाचा निष्कर्ष मोहन भागवत मंगळवारी मीडियाशी संवाद साधल्यानंतर जाहीर करणार आहेत.

सर्वेक्षणानुसार विवाहित महिलांच्या सुखा-समाधानाची पातळी (Married Women Happiness Index) अत्युच्च असते. तर याउलट लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिला तुलनेने कमी सुखी असतात. साहिजकच लिव्ह इन रिलेशनशीपच्या तुलनेत विवाहसंस्थेत अधिक समाधान असल्याकडे हे सर्वेक्षण अंगुलीनिर्देश करतं.

वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवलं, दीराला तीन वर्षांचा कारावास

हे सर्वेक्षण कुठल्या वयोगटातील, देशातील कुठल्या भागात झालं, याविषयी अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे ग्रामीण अथवा शहरी भागातील महिलांचा यात समावेश होता, याबाबतही नेमकी माहिती उपलब्ध नाही.

मोहन भागवत हे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांशीही वार्तालाप करणार आहेत. संघ, संघाची विचारधारा, संघाची कार्यपद्धती याविषयी माहिती देणार आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI