तुमच्याकडे मारुती सुझुकीची ‘ही’ कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

मारुती सुझुकीची एस-प्रेसो ही कार क्रॅश टेस्टमध्ये पूर्णपणे नापास झाली आहे.

तुमच्याकडे मारुती सुझुकीची 'ही' कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

नवी दिल्ली : ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso) या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच ही कार सुरक्षित नसल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. (Maruti Suzuki S-Presso gets zero stars in global NCAP crash test)

ग्बोबल NCAP द्वारे यावेळी तीन मेड इन इंडिया कार्सचे परिक्षण करण्यात आले. त्यामध्ये ह्युंदाई ग्रँड i10 या कारला 2 स्टार, किआ सेल्टोस या कारला 3 स्टार आणि एस-प्रेसो या कारला 0 स्टार देण्यात आले. एस-प्रेसो ही कार मारुतीने एक छोटी एसयूव्ही म्हणून लाँच केली होती. या कारमधील केबिन स्पेस जास्त आहे आणि किंमत मात्र कमी, त्यामुळे या कारला टेस्टसाठी पाठवण्यात आले होते.

सुरक्षिततेच्या बाबतीत एस-प्रेसो ही कार पूर्णपणे नापास झाली आहे. गाडीमध्ये केवळ चालकाच्या बाजूला एअरबॅग देण्यात आली आहे. गाडीमध्ये एअरबॅगचं किती महत्त्व आहे, ही बाब सगळेच जाणतात. तरीदेखील कंपनीने गाडीतील इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार केलेला दिसत नाही.

परिक्षणानंतर एक महत्त्वाची गोष्ट नमूद करण्यात आली आहे की, या गाडीमधील चालक आणि सह-चालकाची छाती आणि मान बिलकुल सुरक्षित नाही. चालकाचे गुडघेदेकील सुरक्षित नाहीत. डॅशबोर्डमुळे सह-चालकाचे गुडघे थोडे सुरक्षित राहीले. एस-प्रेसोच्या बॉडीशेललादेखील फार चांगलं रेटिंग मिळालेलं नाही. ही गाडी अधिक लोडिंग झेलण्यास सक्षम नाही.

कारमधील इतर फिचर्स

मारुती एस-प्रेसोची किंमत 3.71 लाखांपासून ते 5.8 लाख रुपयांपर्यंत आहे. ही छोटी एसयूव्ही Standard, LXI, VXI आणि VXI+ या चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. एस प्रेसोमध्ये 10 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. ईबीडीसह एबीएस, ड्रायव्हर साइड एअरबॅग्स, रिअर पार्किंग सेन्सर्स, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टम असे फीचर्स यामध्ये आहेत.

या कारच्या केवळ टॉप व्हेरिएंटमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग मिळते. तर इतर व्हेरिएंट्समध्ये दुसरी एअरबॅग ऑप्शनल आहे. मारुती एस-प्रेसोमध्ये 1.0 लीटर बीएस 6 उत्सर्जन मानकांचं इंजिन आहे. हे इंजिन 67 एचपी पॉवर आणि 90 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं.

संबंधित बातम्या

Maruti Suzuki च्या 6 सीटर गाडीची लाँचिंग तारीख ठरली

Mahindra THAR चा जलवा कायम, दिवाळीच्या मुहूर्तावर रेकॉर्डब्रेक विक्री

Hyundai ची All New i20 कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Maruti Suzuki S-Presso gets zero stars in global NCAP crash test)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI