AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : महापौर किशोरी पेडणेकरांचं गृहमंत्र्यांना पत्र, आशिष शेलार यांच्या त्या वक्तव्याविरोधात तक्रार

शेलारांच्या कुठे निजला होता? याच वाक्यावर आक्षेप घेत महापौरांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहीत तक्रार केली आहे.

Mumbai : महापौर किशोरी पेडणेकरांचं गृहमंत्र्यांना पत्र, आशिष शेलार यांच्या त्या वक्तव्याविरोधात तक्रार
किशोरी पेडणेकर आणि आशिष शेलारांच्या वादाचे विधानसभेत पडसाद
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 4:14 PM
Share

मुंबई : मुंबईतल वरीळीत काही दिवसांपूर्वी सिलिंडरचा स्फोट झाला, त्यात आतापर्यंत एकूण तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका 4 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या स्फोटांच्या दुर्घटनेनंतर भाजपने आक्रमक होतं महापौरांवर टीकेची झोड उडवली. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महापौरावर टीका केली, मात्र शेलारांच्या या टीकेवरून आता प्रकरण तापलं आहे. शेलारांच्या टीकेवर महापौर किशोरी पेडणेकर आक्रमक आल्या आहेत. त्यावरून त्यांनी तक्रार केली आहे.

किशोरी पेडणेकरांचं गृहमंत्र्यांना पत्र

मुंबईतल्या सिलिंडर स्फोटानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नायर रुग्णालयात रुग्णांन तात्काळ उपचार न करता ताटकळत ठेवल्याचा आरोप केला. यावेळी महापौरांवर टीका करताना. महापौरांना या घटनेची माहिती नव्हती का? 72 तासांनंतर महापौर रुग्णांच्या चौकशीसाठी पोहोचतात, 72 तास कुठे निजला होता? अशा शब्दात टीका केली होती. शेलारांच्या कुठे निजला होता? याच वाक्यावर आक्षेप घेत महापौरांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहीत तक्रार केली आहे. तसेच त्यांनी पोलिसांत तक्रार करत असल्याचंही म्हटलं आहे.

प्रथम नागरिक आणि महिला महापौरांबद्दल असे वक्तव्य चुकीचे

महापौर या शहराच्या प्रथम नागरिक असतात. मी एक महिला महापौर आहे. माझ्याबाबत असे वक्तव्य चुकीचे आहे. असाही महापौरांनी पत्रात उल्लेख केला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा तापलं आहे. या पत्रानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा संघर्ष वाढल्यानं त्याचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यावेळी आशिष शेलार यांनी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही खोचक टीका केली होती.

Goa Election 2022 : आणखी एका आमदाराचा राजीनामा, गोव्यात काँग्रेस ४ वर्षात १७वरून ३ आमदारांवर!

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्समध्ये 840 तर निफ्टीमध्ये 236 अकांची वाढ

Aurangabad : परदेशी प्रवास लपवणाऱ्या दोघांवर औरंगाबादेत गुन्हा दाखल, महापालिकेची प्रवाशांविरोधात तक्रार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.