AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unlock 6.0 | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक 6 ची नियमावली जारी, काय सुरु-काय बंद?

केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनबाबत नव्याने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या अनलॉक 6 नुसार आता 30 ऑक्टोबरपर्यंतच्या निर्बंधांना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Unlock 6.0 | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक 6 ची नियमावली जारी, काय सुरु-काय बंद?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 27, 2020 | 5:14 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनबाबत नव्याने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या अनलॉक 6 नुसार आता 30 ऑक्टोबरपर्यंतच्या निर्बंधांना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबरला जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार 30 ऑक्टोबरपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले होते (MHA issued an order of guidelines for Unlock 6 amid Corona).

गृह मंत्रालयाने आज (27 ऑक्टोबर) पुढील काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यायची आणि कोणत्या गोष्टींमध्ये सूट असेल याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार रिओपनिंगबाबत 30 सप्टेंबरला जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 30 नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या काही गोष्टी सुरु राहतील. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, प्रशिक्षणासाठी जलतरणपटूंसाठी स्विमिंग पूल, तसेच सिनेमा हॉल व मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेसह सुरु करण्यास परवानगी होती.

सामाजिक / शैक्षणिक / क्रीडा / करमणूक / सांस्कृतिक / धार्मिक / राजकीय कार्यक्रमांसाठी बंद जागांमध्ये हॉल क्षमतेच्या जास्तीत जास्त 50 टक्के आणि 200 जणांच्या कमाल मर्यादेसह वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

काय सुरु करण्याची परवानगी?

  • मेट्रो रेल
  • शॉपिंग मॉल
  • हॉटेल-रेस्टॉरन्ट
  • सेवा
  • धार्मिक स्थळं
  • योगा आणि प्रशिक्षण संस्था
  • जीम
  • सिनेमागृहं
  • एन्टरटेनमेंट पार्क

राज्यांच्या स्तरावर आढावा घेऊन काय सुरु करण्याची परवानगी?

  • शाळा
  • प्रशिक्षण संस्था
  • संशोधनासाठीचे राज्याचे आणि खासगी विद्यापीठं
  • 100 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी देणे

निर्बंधांसह सुरु करण्याची परवानगी

  • आंतरराष्ट्रीय विमान प्रवास
  • खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी स्विमिंग पूल
  • 50 टक्के क्षमतेसह सिनेमागृहं
  • 50 टक्के आसनक्षमतेसह आणि 200 पेक्षा व्यक्तींच्या राजकीय सभा, सामाजिक, सांसकृतिक किंवा क्रिडा क्षेत्रातील कार्यक्रम

संबंधित बातम्या :

PM Narendra Modi | लॉकडाऊन गेला, कोरोना नाही, विनामास्क फिरुन कुटुंबाला संकटात टाकू नका : पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिवाळीनंतर धार्मिकस्थळं उघडणार?, राजेश टोपेंनी केलं मोठं विधान

अनलॉक : ताजमहाल प्रदूषणाच्या विळख्यात, प्रदूषित शहरांच्या यादीत आग्रा 9 व्या क्रमांकावर

MHA issued an order of guidelines for Unlock 6 amid Corona

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...