बाळासाहेब थोरातांकडून उत्पादकांची दिशाभूल, केंद्राने दूध भुकटी आयात केलेली नाही : सदाभाऊ खोत

गायीच्या दूधाला 10 रुपये अनुदान आणि दूध भुकटीला 50 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली (Sadabhau Khot on Milk Agitation) आहे.

बाळासाहेब थोरातांकडून उत्पादकांची दिशाभूल, केंद्राने दूध भुकटी आयात केलेली नाही : सदाभाऊ खोत
Namrata Patil

|

Aug 11, 2020 | 7:22 PM

सांगली : राज्यातील दूध उत्पादक चांगलेच आक्रमक झाले आहे. “राज्य सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याने येत्या 13 ऑगस्ट ते 18 ऑगस्टपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. या काळात 5 लाख पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात येणार आहे,” अशी माहिती माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना दिली आहे. सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. (Sadabhau Khot on Milk Agitation)

“महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे खोटं बोलत आहे. दूध भुकटी केंद्राने आयात केली नसताना, दूध भुकटी आयात केली, असं खोटं बोलून थोरात दिशाभूल करत आहे,” असा दावाही सदाभाऊ खोत यांनी केला. “जर दूध भुकटी केंद्राने भुकटी आयात केली असेल, तर त्याचा पुरावा द्यावा,” अशी मागणीही खोत यांनी केली.

“राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. काही दूध संघांचेच दूध खरेदी करत आहे. अशा गोष्टींमुळे सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही,” असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

“तसेच गायीच्या दूधाला 10 रुपये अनुदान आणि दूध भुकटीला 50 रुपये अनुदान द्यावे,” अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

“राज्य सरकारने सताधारी आमदारांना 20 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र हाच निधी आता कोव्हिडच्या रुग्णांसाठी निधी देणं गरजेचं आहे. विकास निधी म्हणून निधी देण्याऐवजी व्हेंटिलेटर, बेड, औषध अशा गोष्टींसाठी खर्च करावा. तात्काळ हा निधी कोव्हिडसाठी वापरात आणावा,” अशीही मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. (Sadabhau Khot on Milk Agitation)

संबंधित बातम्या : 

अमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या, मरण येणारच असेल तर सोशल डिस्टन्स कशाला : राजू शेट्टी

दूध उत्पादकांचा 1 ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार, शेतकरी संघर्ष समितीची घोषणा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें