Salon Reopen | ….तरच राज्यात सलून सुरु करण्याची परवानगी : छगन भुजबळ

महाराष्ट्र नाभिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांची नाशिकमध्ये भेट (Chhagan Bhujbal on Salon and Parlor Reopen) घेतली.

Salon Reopen | ....तरच राज्यात सलून सुरु करण्याची परवानगी : छगन भुजबळ

नाशिक : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील सलून बंद आहेत. यामुळे नाभिक समाजाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी नसल्यामुळे राज्य सरकारकडून परवानगी अद्याप दिलेली नाही. मात्र जर केंद्राने राज्यात सलून सुरु करण्यासाठी परवानगी दिली तर, राज्यातही सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारची तयारी आहे, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. (Chhagan Bhujbal on Salon and Parlor Reopen)

राष्ट्रीय नाभिक महासंघ संलग्न महाराष्ट्र नाभिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांची नाशिकमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी नाभिक समाजाला लॉकडाऊन काळात झालेल्या अडचणींचे निवेदन दिले.

कोरोनाच्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे नाभिक समाज त्रस्त झाला आहे. अनेकजण कर्जबाजारी होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व बाबींचा विचार करून नाभिक समाजाचे सलून आणि पार्लर सुरु करण्यास परवानगी द्यावी. तसेच त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशा काही मागण्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळांसमोर मांडल्या.

हेही वाचा – दाढी-कटिंगसाठी दुप्पट दर, महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनचा निर्णय

यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत सलून व्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भुजबळांनी नाभिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच सलून सुरु करण्याबाबत अद्याप केंद्राकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. जर केंद्राकडून राज्यात सलून सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली, तर राज्यातही सलून सुरु करण्यासाठी सरकारची तयार आहे, असे भुजबळ म्हणाले.  (Chhagan Bhujbal on Salon and Parlor Reopen)

संबंधित बातम्या : 

सलून सुरु करुन नाभिक समाजाला न्याय द्या : फडणवीस

राज्य सरकारने आर्थिक मदत करुन दुकानं बंद ठेवण्यास सांगावं, सलून व्यवसायिक आक्रमक

Published On - 12:13 am, Sun, 14 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI