विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यास अनुमती, केंद्रीय गृहमंत्रालयाचं शिक्षण विभागाला पत्र

विद्यापीठ आणि शिक्षण संस्था यांना परीक्षा घेण्यास परवानगी देण्यात आली (Ministry of home affairs permits conduct Examination) आहे.

विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यास अनुमती, केंद्रीय गृहमंत्रालयाचं शिक्षण विभागाला पत्र

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विद्यापीठांच्या परीक्षा रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने शिक्षण विभागाला पत्र लिहिलं आहे. यात विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांही परीक्षा घेऊ शकणार आहेत. (Ministry of home affairs permits conduct Examination)

केंद्रीय गृहमंत्रालयाने शिक्षण विभागाला दिलेल्या माहितीनुसार, “विद्यापीठ आणि शिक्षण संस्था यांना परीक्षा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) गाईडलाईनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार परीक्षा घेण्यास परवानगी देण्यात येत आहे. या परीक्षा केंद्रीय आरोग्य खात्याच्या प्रक्रियेनुसार करण्यात येतील.”

 

त्याशिवाय विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा संदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहे. यात विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या सप्टेंबर 2020 महिनाअखेरपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा घ्यावी अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने परीक्षा महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. परीक्षामधील यश विद्यार्थ्यांना विश्वास आणि समाधान देते, असे युजीसीचे म्हणणे आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान युजीसीच्या या निर्णयानंतर राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांचे काय होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Ministry of home affairs permits conduct Examination)

मुख्यमंत्र्यांचे मोदींना पत्र

दरम्यान काही दिवसांपूर्वी “अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परीक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्था आणि विद्यापीठांना सूचना द्यावी,” अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली होती.

“महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे महापालिका क्षेत्र, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अकोला, पालघर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. राज्यातील विद्यार्थी आणि पालक हे 2019-20 या वर्षाच्या अंतिम परीक्षेबाबत तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाबाबत चिंतेत आहेत,” असेही मुख्यमंत्र्यांनी यात म्हटलं होतं.

“सध्याचे वातावरण हे कोणत्याही परीक्षांसाठी आणि वर्ग सुरु करण्यासाठी अनुकूल नाही. विषाणू प्रादुर्भावाच्या सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे हे विद्यार्थी आणि पालकांबरोबरच स्थानिक जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, परीक्षा घेणाऱ्या ॲथॉरिटी, वाहतूक प्रशासन या सर्वांवरचा ताण वाढवणारे आहे.” याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे.

अंतिम वर्षातील परीक्षा न घेता पदवी देता येईल : उदय सामंत

तर दुसरीकडे “अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी देता येईल. ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी लिहून द्यावे, त्यांची परीक्षा घेतली जाईल. कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा घेता येतील.” असं मत महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं.

“अव्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा घेतली जाणार नाही. विद्यार्थ्यांना हवी असल्यास ऐच्छिक परीक्षा घेतली जाईल,” असं उदय सामंत यांनी नमूद केलं.

“कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या, इंजिनिरिंग, फार्मसी, आदी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत. यासाठी राज्य सरकारने, राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समितीने निर्णय घेतला होता,” असे उदय सामंत म्हणाले होते. (Ministry of home affairs permits conduct Examination)

संबंधित बातम्या : 

अंतिम वर्षाची परीक्षा न घेता पदवी, इंजिनिअरिंग, फार्मसीच्याही परीक्षा नाहीत, ATKT चा निर्णय बाकी : उदय सामंत

Professional Courses | व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या सूचना द्या, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI