‘मिर्झापूर 2’चा टीझर प्रदर्शित, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

अमेझॉन प्राईमचा सुपरहिट वेब शो मिर्झापूर सीझन 1 ला प्रदर्शित (Mirzapur season 2 teaser)  होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले.

'मिर्झापूर 2'चा टीझर प्रदर्शित, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

मुंबई : अमेझॉन प्राईमचा (Amazon prime) सुपरहिट वेब शो मिर्झापूर सीझन 1 ला प्रदर्शित (Mirzapur season 2 teaser)  होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. याच निमित्ताने अमेझॉन प्राईमकडून मिर्झापूर 2 वेब शोची एक झलक प्रेक्षकांसमोर प्रदर्शित केली आहे. विशेष म्हणजे या टीझरच्या (Mirzapur season 2 teaser) माध्यमातून अभिनेता पंकज त्रिपाठी उर्फ कालीन भैयाने इन्स्टाग्रामवर डेब्यू केला आहे.

अमेझॉन प्राईमनेही मिर्झापूर सीझन 2 चा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सीझन 2 येत असल्याची जाणीव होत आहे ना? असं अमेझॉन प्राईमने व्हिडीओ पोस्ट करताना म्हटले आहे.

“मिर्झापूरला एक वर्ष पूर्ण झाले आणि हे एक दमदार वर्ष होते. मिर्झापूर हा एक असा शो आहे ज्याच्या माध्यमातून मला प्रेक्षकांकडून प्रेम आणि प्रशंसा मिळाली. या शोमुळे मला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. मी जिथे पण जातो तिथे लोक मला कालीन भैया नावाने आवाज देतात. सिझन 2 साठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे चित्रपट कधी प्रदर्शित होणार, असे मला लोक नेहमी विचारतात. प्रेक्षकांप्रमाणे मी पण सीझन 2 प्रदर्शित होण्यासाठी उत्सुक आहे. मिर्झापूरला आज (16 नोव्हेंबर) वर्षपूर्ती होत आहे. यानिमित्ताने आम्ही मिर्झापूर सीझन 2 चा टीझर लाँच केला आहे. त्यासोबतच मी माझे इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केले आहे”, असं पकंज त्रिपाठी म्हणाला.

मिर्झापूर एक वेब शो चित्रपट आहे. यामध्ये नशेची औषधं, बंदूका आणि अयोग्यतेने भरलेले गुन्हेगारी विश्व या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये जाती, शक्ती, अहंकार आणि हिंसा असे चार पैलू दाखवले आहेत. या चित्रपटाची कथा पुनीत कृष्णा आणि करण अंशुमान यांनी लिहिली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले आहे.

दरम्यान, सीझन 1 प्रमाणे सीझन 2 सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असं म्हटलं जात आहे. सीझन 1 प्रदर्शित झाला होता तेव्हा काही दिवसात या वेब शोने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली होती. त्यामुळे सीझन 2 वेब शोलाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, अशी चर्चा आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI