AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदानादरम्यान मजुरांना गावी परतण्याची सोय करता, आपत्ती काळात विरोध कशाला : सदाभाऊ खोत

राज्यातील मजुरांना, कामगारांना ही सवतीची भूमिका का?" असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला (Sadabhau Khot On worker stuck in Mumbai Pune) आहे.

मतदानादरम्यान मजुरांना गावी परतण्याची सोय करता, आपत्ती काळात विरोध कशाला : सदाभाऊ खोत
| Updated on: May 18, 2020 | 6:31 PM
Share

पुणे : मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अडकलेल्या राज्यातील मजुरांसाठी (Sadabhau Khot On worker stuck in Mumbai Pune) रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पावित्रा धारण केला आहे. या मजुरांना गावात प्रवेश देण्यास विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही त्यांनी समाचार घेतला. मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरातील मजुरांना गावी परतण्याची सोय सरकारनं त्वरित करावी, अशा सूचनाही सदाभाऊ खोत यांनी केल्या.

“निवडणुकीत मतदानासाठी या कामगारांना गावात आणण्यात सर्वच (Sadabhau Khot On worker stuck in Mumbai Pune) राजकीय पक्ष पुढे असतात. हे कामगार तुमचा जयजयकार करण्यासाठी चालतात. मग अशा आपत्तीच्या काळात या मजुरांना त्यांच्या गावात विरोध का करता,” असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

“आम्ही या कामगारांना, मजुरांना वाऱ्यावर सोडणार नाही. यासाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी. अन्यथा आंदोलन करु,” असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

“लॉकडाऊनमुळे मुंबई, पुण्यासारख्या महानगरात अनेक ठिकाणी राज्यातील मजूर कामगार अडकले आहेत. त्यांच्या जवळील पैसा आणि अन्नधान्य संपलं आहे. अशाही परिस्थितीत ते हजारो मैल पायपीट करत आहे. सरकार देशातील नागरिकांना परदेशातून विमानानं मायदेशात आणत आहे. तर राज्यातील परप्रांतीयांना रेल्वे आणि बसने पाठवत आहे. मग राज्यातील मजुरांना, कामगारांना ही सवतीची भूमिका का?” असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.

“या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी. अन्यथा परप्रांतीय मजुरांप्रमाणे राज्यातील मजूरांचा प्रश्न ही गंभीर बनेल,” अशी भीती खोत यांनी व्यक्त केली. मजूर गावात आल्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्वारटांईन करुन ठेवा, अशी सूचना ही त्यांनी (Sadabhau Khot On worker stuck in Mumbai Pune) केली.

संबंधित बातम्या : 

Solapur Corona Update | सोलापुरात 50 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, प्रतिबंधित क्षेत्रातही घट

Raigad corona update : रायगडमध्ये 24 तासात 38 नवे रुग्ण, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 518 वर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.