कोरोना काळात भ्रष्टाचाराची हीच ती वेळ, संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसत (Sandeep Deshpande on Shivsena) आहे.

कोरोना काळात भ्रष्टाचाराची हीच ती वेळ, संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Jun 30, 2020 | 9:14 AM

मुंबई : पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसत (Sandeep Deshpande on Shivsena) आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावरुन शिवसेनेवर निशाणा साधत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. देशपांडे यांनी ‘शेम ऑन शिवसेना’ असा हॅशटॅगचा वापर करत सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या पोस्ट (Sandeep Deshpande on Shivsena) केल्या आहेत.

शिवसेनेची हीच ती वेळ अशी टॅग लाईन वापरत देशपांडेनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कोरोना काळात भ्रष्टाचार करण्याची हीच ती वेळ, अशी पोस्ट करण्यात आली आहे.

मृतांचा आकड़ा लपवून जनतेची फसवणूक करण्याची हीच ती वेळ, असंही एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

नुकतेच शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी देशपांडे यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. या नोटीसचा फोटो ट्वीट करत “असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे लाथ मारणारच”, असं संदीप देशपांडे म्हणाले होते.

संदीप देशपांडे यांनी तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावेळी पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी वरुण सरदेसाई यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर वरुण सरदेसाई यांच्याकडून संदीप देशपांडे यांना मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे.

संदीप देशपांडेंचे महापालिकेवर आरोप

संदीप देशपांडे यांनी 26 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात आलेल्या मृतदेह बॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याशिवाय कोरोना संकंट काळात महापालिकेने खरेदी केलेले पीपीई किट, मास्क यामध्येदेखील घोटाळा झाल्याचा आरोप केला.

संबंधित बातम्या :

असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, वरुण सरदेसाईंना संदीप देशपांडेंचा थेट इशारा

राऊत साहेब… तर मी स्वत: ‘सामना’त येऊन तुमच्या पाया पडेन : संदीप देशपांडे

Non Stop LIVE Update
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....