MNS Morcha Against Electricity Bill Live : वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा ‘झटका मोर्चा’, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने आक्रमक पावित्रा घेत आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. (MNS morcha against electricity bill Live Update)

MNS Morcha Against Electricity Bill Live : वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा 'झटका मोर्चा', कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 1:09 PM

मुंबई : वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने आक्रमक पावित्रा घेत आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. भरमसाठ वीज बिल प्रकरणी मनसेने आज राज्यभरात ‘झटका मोर्चा’चे आयोजन केले आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मात्र अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. (MNS morcha against electricity bill Live Update)

?LIVE UPDATE?

[svt-event title=”ठाण्यात मनसेचं आंदोलन पेटलं” date=”26/11/2020,1:09PM” class=”svt-cd-green” ] ठाण्यात मनसेचं आंदोलन पेटलं, पोलीस-मनसे कार्यकर्त्यांत बाचाबाची; अभिजीत पानसे, अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांची टीका ” date=”26/11/2020,12:20PM” class=”svt-cd-green” ] सरकार जर गंभीर असेल तर दखल घेईल, जर गंभीर नसेल तर सरकारला मनसेच्या भाषेत इथून पुढे आंदोलन करेल, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांची टीका [/svt-event]

[svt-event title=”जर त्यांचं सरकार जनतेचे असेल तर ते मागणी मान्य करतील – बाळा नांदगावकर” date=”26/11/2020,12:08PM” class=”svt-cd-green” ] पोलीस आपलं काम करतात, आम्ही आमचं काम करतो आहे, आम्ही आंबेडकर गार्डन येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री यांचे निवासस्थान, जर त्यांचं सरकार जनतेचे असेल तर ते मागणी मान्य करतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुढील भूमिका तयार आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”विदर्भातील वर्धा, नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह ठिकठिकाणी मनसे आक्रमक” date=”26/11/2020,12:03PM” class=”svt-cd-green” ] वीज बिल माफीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा, वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा, वर्ध्यात जिल्हाध्यक्ष अतुल वांदिलेंच्या नेतृत्वात आंदोलन, वीज बिलाच्या मागणीसाठी मनसे आक्रमक विदर्भातील वर्धा, नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह ठिकठिकाणी मनसे आक्रमक, लॅाकडाऊनमध्ये आलेल्या अतिरिक्त वीज बिलाच्या माफीसाठी आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात कलम 144 लागू” date=”26/11/2020,11:58AM” class=”svt-cd-green” ] वाढीव वीज बिलासंदर्भात ठाण्यात देखील मनसैनिक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांकडून कलम 144 लागू, जमावबंदी आणल्याने मनसेला मोर्चासाठी परवानगी नाकारली [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना 149 ची नोटीस” date=”26/11/2020,11:56AM” class=”svt-cd-green” ] नाशिक – मनसेच्या नियोजित मोर्च्यापूर्वी अनेक नेत्यांना नोटीस, पोलीस प्रशासनाकडून 149 अंतर्गत कारवाईच्या नेत्यांना नोटीस, वीज बिलाविरोधातील मोर्चात मनसेचे अनेक नेते कार्यकर्ते होणार सहभागी [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील मनसे शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांना 149 ची नोटीस” date=”26/11/2020,11:53AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील मनसे शहराध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांना 149 ची नोटीस, नोटीस बजावल्या तरी मोर्चा निघणार, मनसेची ठाम भूमिका, वाढीव वीजबिला विरोधात शनिवार वाड्यापासून मनसेचा मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा समारोप [/svt-event]

मुंबईत म्हाडा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चासाठी मनसेने परवानगी मागतली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहेि. त्यामुळे सुरक्षेचं कारण सांगत पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारली आहे. पण पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून निवेदन देण्यास परवानगी दिली आहे.

ठाण्यात कॅडबरी जंक्शनपासून खोपट सिग्नल आणि टेंभीनाका मार्गे  जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर मनसेने मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे ठाणे, पालघर या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक जमा होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मनसैनिक मोठ्या संख्येने येणार असल्याने जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मनसैनिक जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना रोखण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भावही वाढत असल्यामुळे ठाणे पोलिसांनी जिल्हाबंदीचे आदेश दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून याला मंजुरी देण्यात आली.(MNS morcha against electricity bill Live Update)

संबंधित बातम्या : 

मनसेच्या भव्य मोर्चावर ठाणे पोलिसांकडून ब्रेक, जिल्हाबंदीच्या आदेशामुळे गोंधळ

मनसेच्या मोर्चाला मुंबई पोलिसांचा नकार, पण मोर्चा काढण्यावर कार्यकर्ते ठाम

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.