गुरुग्रामच्या रस्त्यावर धावत्या बर्निंग कारचा थरार
गुरूग्राम (हरियाणा) : पेट घेतलेली कार धावत असतानाचा थरार हरियाणातील गुरुग्राममध्ये पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बुधवारी सायंकाळची ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे. गुरुग्राममधील राजीव गांधी पुलावर ही घटना घडली. एका होंडा सिटी कारला अचानक लागलेल्या आगीने तिने पेट घेतला. पेट घेत-घेत ही गाडी रस्त्यावर धावू लागली. […]

गुरूग्राम (हरियाणा) : पेट घेतलेली कार धावत असतानाचा थरार हरियाणातील गुरुग्राममध्ये पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बुधवारी सायंकाळची ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे.
गुरुग्राममधील राजीव गांधी पुलावर ही घटना घडली. एका होंडा सिटी कारला अचानक लागलेल्या आगीने तिने पेट घेतला. पेट घेत-घेत ही गाडी रस्त्यावर धावू लागली. विशेष म्हणजे गाडीने जेव्हा पेट घेतला तेव्हा चालकाने गाडीतून बाहेर उडी मारली, पण तरीही कार धावत होती.
भर रस्त्यात पेट घेतलेली कार धावत असल्याचं पाहून भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या कारला पाहून अनेक वाहनं उलट्या दिशेने धावायला लागली. चालकाचं नाव राकेश असं सांगितलं जात आहे. दिवाळीचं फराळ घेऊन तो आपल्या नातेवाईकांकडे जात असताना ही घटना घडली.
पाहा व्हिडीओ :
Non Stop LIVE Update