एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची धडक कारवाई, गँगस्टर विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात बेड्या

विकास दुबेच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई (Mumbai ATS Arrested Vikas Dubey two Partner) केली.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची धडक कारवाई, गँगस्टर विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात बेड्या

ठाणे : कानपूरमधील आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणासह 60 पेक्षा अधिक गुन्हे असलेला कुख्यात गुंड विकास दुबे याचा चकमकीत खात्मा झाला. विकास दुबेच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली. विकास दुबेचे साथीदार असलेल्या अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा ड्राईव्हर सोनू तिवारी या दोघांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसचे पोलीस निरीक्षक एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी ही धडक कारवाई केली. (Mumbai ATS Arrested Vikas Dubey two Partner from thane)

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात मोस्ट वॉन्टेड गँगस्टर विकास दुबे याचा खात्मा झाला. या घटनेनंतर त्याचे सर्व साथीदार फरार झाले आहेत. यातील एक आरोपी अरविंद उर्फ गुददन त्रिवेदी हा ठाणे येथे लपल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसचे पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दया नायक यांनी गँगस्टर अरविंद उर्फ गुददन त्रिवेदी आणि त्याचा ड्राईव्हर सोनू तिवारी यांना अटक केली. अरविंद हा विकास दुबेचा साथीदार आहे. विकास दुबे याला काल उत्तरप्रदेशाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी चकमकीत मारलं आहे.

कोण होता विकास दुबे?

विकास दुबेवर चौबेपूर पोलीस ठाण्यात जवळपास 60 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. अशाच एका हत्या प्रकरणात विकास दुबेला अटक करण्यासाठी पोलीस कानपूरमध्ये गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या पथकावर त्याच्या गुंडांकडून बेछुट गोळीबार करण्यात आला. या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिस शहीद झाले, तर सात पोलीस जखमी झाले.

हेही वाचा : Vikas Dubey Encounter | विकास दुबे पहाटे 6.18 ला पळाला, 6.40 ला खात्मा, 22 मिनिटात काय काय घडलं?

कानपूरच्या चौबैपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकरु गावात हा प्रकार घडला. दुबेच्या घराला तटबंदी असून पोलिसांची कोंडी करुन त्यांच्यावर दुबेच्या गुंडांनी हल्ला केला.

विकास दुबे हा अनेक राजकीय पक्षांशी संबंधित होता. त्यामुळे तो आजपर्यंत पकडला गेला नाही. विकास दुबे याने 2001 मध्ये पोलीस ठाण्यात घुसून भाजप नेते आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. संतोष शुक्ला हत्या प्रकरणामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली होती.  (Mumbai ATS Arrested Vikas Dubey two Partner from thane)

संबंधित बातम्या : 

Vikas Dubey Encounter | गँगस्टर विकास दुबेचा खात्मा, STF ची गाडी उलटल्यानंतर पोलिसांशी चकमक

Encounter | तोच थरार, तसाच दावा, कानपूर आणि हैदराबाद एन्काऊंटरमधील साम्य आणि फरक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI