मंदिरे उघडण्याच्या मागणीवरुन भाजप अध्यात्मिक आघाडी पुन्हा आक्रमक, राज्यपालांची भेट, मंदिरांचे टाळे तोडण्याचा इशारा

भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत मंदिरं सुरु करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत जैन, बौद्ध, शिख, महानुभाव, इस्कॉन, सन्यासी आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंदिरे उघडण्याच्या मागणीवरुन भाजप अध्यात्मिक आघाडी पुन्हा आक्रमक, राज्यपालांची भेट, मंदिरांचे टाळे तोडण्याचा इशारा
सागर जोशी

|

Oct 28, 2020 | 1:21 PM

मुंबई: राज्य सरकारनं अनलॉकमध्ये हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स, काहीअंशी लोकलसेवा सुरु केली असली तरी राज्यातील मंदिरं अद्याप बंदच आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची अध्यात्मिक आघाडी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत मंदिरं सुरु करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत जैन, बौद्ध, शिख, महानुभाव, इस्कॉन, सन्यासी आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (BJP spiritual front meets governor, demands to start temples in the state)

1 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील मंदिरं सुरु करा, अन्यथा मंदिरांची टाळी तोडणार असा इशाराच तुषार भोसले यांनी दिला आहे. भाजपनेही यापूर्वी राज्यभरात आंदोलनं केली होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय अजूनही कायम ठेवला आहे.

मंदिराच्या मुद्द्यावरुन राज्यपाल आणि मुख्यमंत्री संघर्ष

राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रावरुन जोरदार राजकारण रंगलेलं संपूर्ण राज्यानं पाहिलं आहे. त्या पत्रात राज्यापालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन देण्यासाठी काही प्रश्न विचारे होते. ‘राज्यात बार-रेस्टॉरंट सुरु झाले, मग देव कुलुपबंद का? तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला आहे का?’ अशाप्रकारच्या पश्नांचा त्यात समावेश होता. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच ते कुणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.

शरद पवार यांचेही राज्यपालांना खडेबोल

‘राज्यपाल हे देशातील महत्वाच्या आणि आदरणीय पदांपैकी एक पद आहे. त्या पदाचा आदर जसा राखला जातो, तसाच मुख्यमंत्री या पदाचाही राखला गेला पाहिजे. आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी पदावर राहावं नाही हे ठरवावं’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. तसंच पवार यांनी राज्यपालांच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त करताना थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर आक्षेप व्यक्त केला होता.

अमित शाहांनीही फटकारलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राज्यपाल कोश्यारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरुन फटकारलं होतं. राज्यपालांनी ‘त्या’ पत्रात काही शब्द टाळायला हवे होते, अशा शब्दात शाह यांनी आपली नाराजी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या:

स्वाभिमान शिल्लक असेल तर पदावर राहायचं की नाही ठरवायला हवं!, शरद पवार यांचा राज्यपाल कोश्यारींवर हल्लाबोल

‘त्या’ शब्दाला विरोध म्हणजे पूर्ण संविधानालाच विरोध करण्यासारखं, जितेंद्र आव्हाडांचा राज्यपालांवर पलटवार

उद्धव ठाकरेंना लिहलेल्या ‘त्या’ पत्रात राज्यपालांनी काही शब्द टाळायला पाहिजे होते- अमित शाह

मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला!, शिवसेनेने राज्यपालांना पुन्हा डिवचले

BJP spiritual front meets governor, demands to start temples in the state

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें