वसई-विरार महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायलयाची स्थगिती

वसई विरार शहर महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायलयाने स्थगिती दिली आहे.(Mumbai High Court  stay on Vasai Virar Municipal election process)

वसई-विरार महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायलयाची स्थगिती
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 11:03 AM

वसई-विरार : वसई विरार शहर महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायलयाने स्थगिती दिली आहे. प्रभाग रचनेच्या प्रक्रियेसंदर्भात निवडणूक आयोग प्रतिज्ञापत्र सादर करेपर्यंत ही स्थगिती देण्यात आली आहे. प्रभाग रचनेच्या घेतलेल्या हरकतीवर योग्य ती दाद न मिळाल्याने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याबाबतची पुढील सुनावणी 29 ऑक्टोबरला होणार आहे. (Mumbai High Court  stay on Vasai Virar Municipal election process)

काँग्रेसचे वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस आणि पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वसई विरार शहर महापालिकेत एकूण 115 वॉर्ड आहेत. अनेक प्रभागात मतदार संख्येत तफावत आढळल्या आहेत. वॉर्ड रचना करताना 2010 आणि 2015 चा निकष पकडला आहे. पण 2010 ची वॉर्ड रचना 2001 मधील जनगणनेच्या आधारे केली होती तर 2015 वॉर्ड रचना 2011 जनगणना आधारे करण्यात आली होती. तेच निकष 2020 च्या ही प्रभाग रचनेसाठी लावले आहेत, असा आक्षेप घेऊन भौगोलिक रचना लक्षात घेतली नसल्याचे याचिका कर्त्याचे म्हणणे होते.

या प्रकरणी 25 फेब्रुवारी 2020 रोजी वसई विरार महानगरपालिकेने निवडणुकाबाबत अधिसूचना जारी केली. तसेच 2 मार्चला आरक्षणाची सोडत घेतली होती. त्यावेळी आरक्षण, वॉर्ड रचना, भौगोलिक रचना याबाबत वर्तक यांनी लेखी हरकती घेतल्या होत्या.

या हरकतीवर 11 सप्टेंबरला विरार येथे निवडणूक निरीक्षक संजय मीना यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली होती. मात्र एक हरकत मान्य करून अन्य सर्व हरकती फेटाळून लावल्याचे महानगरपालिका आयुक्त यांनी कळविले होते.

दरम्यान याप्रकरणी दाद मिळत नसल्याने अखेर समीर वर्तक यांनी मुंबई उच्च न्यायालयात महानगरपालिका निवडणुकाबाबत याचिका दाखल केली. याची पहिली सुनावणी 15 ऑक्टोबरला झाली.

यावर महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगत 20 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होतेय. तर 22 ऑक्टोबरला सुनावणीच्या वेळी राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात याचिकेची प्रत मिळाली नसल्याचे सांगितले.

त्यानंतर 27 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी असा निर्णय सुनावला आहे.

वॉर्ड रचना, आरक्षण, भौगोलिक रचना संबधी हरकती मांडल्या. मात्र दाद मिळाली नाही म्हणून न्यायालयाचे दार ठोठावल्यानतंर त्याबाबत न्यायालयाने चांगला निर्णय घेतला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी दिली. (Mumbai High Court  stay on Vasai Virar Municipal election process)

संबंधित बातम्या : 

तब्बल 219 दिवसांनंतर ‘आपली बस’ प्रवाशांच्या सेवेत; नागपूरकरांना दिलासा

नागपूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदी डॉ. संजय दुधे यांची नियुक्ती

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....