कृणाल पांड्याच्या बॅगेत महागडी रत्नजडित घड्याळं; महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तीन तास कसून चौकशी

कृणालच्या चौकशीनंतर ही घड्याळे मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. | Krunal Pandya

कृणाल पांड्याच्या बॅगेत महागडी रत्नजडित घड्याळं; महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तीन तास कसून चौकशी
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 9:29 AM

मुंबई: दुबईतील आयपीएल स्पर्धा संपवून माघारी परतलेल्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघातील खेळाडू कृणाल पांड्या (Krunal Pandya) याला गुरुवारी महसूल गुप्तचर संचलनालयाकडून (DRI) ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या बॅगेत दुबईवरून आणलेली महागडी रत्नजडित घड्य़ाळे सापडली होती. या घड्याळांवरील आयात शुल्क (Import duty) चुकवण्यासाठी कृणाल पांड्याने ही घड्याळे बॅगेत लपवली होती. मात्र, गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना याचा सुगावा लागला आणि त्यांनी मुंबई विमानतळावर कृणालला ताब्यात घेतले होते. (Krunal Pandya was questioned for about three hours by DRI officials on Mumbai Airport)

मुंबई इंडियन्सचा संघ शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल झाला होता. त्यानंतर कृणालला ताब्यात घेण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यानंतर DRIच्या अधिकाऱ्यांकडून कृणाल पांड्या याची तीन तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर कृणाल पांड्या याला सोडून देण्यात आले.

कृणालच्या बॅगेत Audemars Piguet आणि रोलेक्स कंपनीची रत्नजडित घड्याळे होती. या घड्याळांची किंमत जवळपास 1 कोटी इतकी आहे. परदेशातून भारतात आयात केल्या जाणाऱ्या चैनीच्या वस्तूंवर 38.5 टक्के इतका कर भरावा लागतो. मात्र, कृणाल हा कर चुकवून ही घड्याळे भारतात आणण्याच्या प्रयत्नात होता.

कृणालच्या चौकशीनंतर ही घड्याळे मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. ही घड्याळे हवी असल्यास कृणालला सीमाशुल्क आणि दंड भरावा लागेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कृणाल पांड्या हा हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ आहे. हे दोघेजण मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळतात. याशिवाय, कृणालने 18 आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 14 विकेट्स मिळवण्याबरोबरच त्यानं 121 धावा केल्या आहेत. नोव्हेंबर 2018 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

2016 च्या आयपीएलमध्ये पदार्पण झाल्यापासून पांड्या मुंबई इंडियन्स संघातून खेळत आहे. कृणालने आतापर्यंत 55 सामने खेळले आहेत आणि 891 धावा केल्या आहेत. तसेच आतापर्यंत 40 विकेट्सही घेतल्या आहेत.

इतर बातम्या:

हार्दिक पांड्याची कसून मेहनत, जबरदस्त व्हिडीओ शेअर

IPL FINAL 2020, MI vs DC : अंतिम सामन्याआधी सचिन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्सला महत्वाचा सल्ला

(Krunal Pandya was questioned for about three hours by DRI officials on Mumbai Airport)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.