IPL FINAL 2020, MI vs DC : अंतिम सामन्याआधी सचिन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्सला महत्वाचा सल्ला

सचिनने व्हिडीओद्वारे मुंबईच्या खेळाडूंना मोलाचा सल्ला दिला आहे.

IPL FINAL 2020, MI vs DC : अंतिम सामन्याआधी सचिन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्सला महत्वाचा सल्ला
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 6:25 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील फायनल मॅच (IPL 2020 Final) आज (10 नोव्हेंबर) खेळण्यात येणार आहे. ही फायनल मॅच गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळली जाणार आहे. या सामन्याला आता काही मिनिटं शिल्लक राहिली आहेत. टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सला  एक महत्वाचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ मुंबईच्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर करण्यात आला आहे. ipl 2020 final 2020 sachin tendulkar gives special message to mumbai indians players before final

सचिन काय म्हणाला?

“संघ मालक आणि सपोर्ट स्टाफ तुमच्यासोबत ठामपणे उभे आहेत. तुम्ही जेव्हा मुंबईसाठी खेळता, तेव्हा तुम्ही एकटे नसता, तर तुम्ही एक टीम म्हणून खेळत असता. या पाठिंब्यामुळे अशा महत्वाच्या सामन्यात तुम्हाला चांगली खेळी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक कुटुंब आहात. खेळ असो वा जीवन, चढ उतार प्रत्येक ठिकाणी असतात. आव्हान येतात. त्यामुळे आव्हानाला सामोरे जाण्यसाठी आपलं एकत्र असणं महत्वाचं आहे. तसेच आपण एकत्र राहिल्यामुळे यशस्वी होता येतं”, असा म्हत्वपूर्ण आणि मोलाचा सल्ला सचिनने मुंबई इंडियन्सला दिला आहे.

मुंबईची 5 वी तर दिल्लीची पहिली वेळ

आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची ही 5 वी वेळ आहे. याआधी मुंबईने 2010, 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये फायलनमध्ये धडक मारली होती. यामध्ये 2010 या सालचा अपवाद वगळता मुंबईने प्रत्येक वेळेस विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नईने 2010 मध्ये अंतिम सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीची अंतिम सामन्यात पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईला अंतिम सामन्यात खेळण्याचा अनुभव आहे. तर दिल्लीची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अनुभवी मुंबईसमोर दिल्ली कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार) कायरन पोलार्ड, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पेटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कृणाल पांड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, कगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, अक्षर पटेल, संदीप लमिछाने, किमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिक नोर्तजे, अॅलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोयनिस आणि ललित यादव.

संबंधित बातम्या :

IPL 2020 Final MI vs DC : हिटमॅन रोहित शर्माची आयपीएल फायनल सामन्यांमधील कामगिरी

IPL 2020 Final, MI vs DC Live Updates : अंतिम सामन्यात अनुभवी मुंबई विरुद्ध युवा दिल्ली आमनेसामने

ipl 2020 final 2020 sachin tendulkar gives special message to mumbai indians players before final

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.