IPL 2020 Final, MI vs DC : हिटमॅन रोहित शर्माची धमाकेदार कामगिरी, मुंबईचा दिल्लीवर 5 विकेट्सने ‘इशान’दार विजय, पाचव्यांदा पटकावलं आयपीएलंच विजेतेपद

मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली.

IPL 2020 Final, MI vs DC :  हिटमॅन रोहित शर्माची धमाकेदार कामगिरी, मुंबईचा दिल्लीवर 5 विकेट्सने 'इशान'दार विजय, पाचव्यांदा पटकावलं आयपीएलंच विजेतेपद
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 11:29 PM

दुबई : हिटमॅन रोहित शर्माच्या (Hitman Rohit Sharma) धमाकेदार खेळीच्या जोरावर आणि इशान किशनच्या (Ishan Kishan) नाबाद 33 धावांच्या शानदार खेळीच्या साहाय्याने मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा आयपीएलंच विजेतेपद पटकावलं आहे. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 5 विकेट्स गमावून 18.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. इशान किशनने नाबाद 33 धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नोर्तजेने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा आणि मार्कस स्टोयनिसने प्रत्येकी 1 विकेट घेतला. ipl 2020 final mi vs dc live score update cricket match mumbai indians vs delhi capitals final in dubai live  लाईव्ह स्कोअरकार्ड

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या मुंबईची धमाकेदार सुरुवात झाली. मुंबईच्या रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक या जोडीने 45 धावांची सलामी भागीदारी केली. यानंतर मुंबईला पहिला धक्का लागला. क्विंटन 20 धावांवर बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. या दोघांनी चांगली फलंदाजी केली. मात्र 11 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रोहित आणि सूर्यकुमार यादव यांचा ताळमेळ बिघडला. चोरटी रन घेण्याच्या नादात रोहित नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने धावत आला. मात्र रोहितला वाचवण्यासाठी सूर्यकुमारने आपल्या विकेटचे बलिदान दिले. सूर्यकुमार 19 रन्सवर रन आऊट झाला.

यानंतर इशान किशनसोबत रोहितने धावफळक हलता ठेवला. या दरम्यान रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केलं. तिसऱ्या विकेटसाठी या जोडीने 47 धावांची भागादारी केली. मात्र यानंतर रोहितने 16.2 ओव्हरमध्ये मोठा फटका खेचला. पण तिथे असलेल्या बदली खेळाडू ललित यादवने भन्नाट कॅच घेत रोहितला बाहेरचा रस्ता दाखवला. रोहितने 51 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्ससह 68 धावांची विजयी खेळी केली.

रोहितनंतर कायरन पोलार्डही 9 धावांवर बाद झाला. मात्र इशान किशन एक बाजू धरुन होता. पोलार्ड बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या मैदानात आला. मात्र मुंबईला विजयासाठी 1 धावेची आवश्यकता असताना 3 धावांवर बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या कृणाल पाडंयाच्या साहय्याने इशान किशनने मुंबईला विजय मिळवून दिला. इशानने 19 चेंडूत 3 फोर आणि 1 सिक्ससह नाबाद 33 धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नोर्तजेने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा आणि मार्कस स्टोयनिसने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. दिल्लीने कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद 65 धावा केल्या. तर ऋषभ पंतने 56 धावांची खेळी केली. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या दिल्लीची खराब सुरुवात झाली दिल्लीला पहिल्याच चेंडूवर पहिला झटका लागला. मार्कस स्टोयनिस शून्यावर बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणेही 2 धावांवर बाद झाला. दमदार कामगिरी करत असलेल्या शिखर धवनने आज निराशा केली. जंयत यादवने धवनला 15 धावांवर बाद केले. त्यामुळे दिल्लीची 22-3 अशी स्थिती झाली.

मात्रा यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या जोडीने दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 96 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान ऋषभने आपले अर्धशतक पूर्ण केलं. पंत-अय्यर जोडी सेट झाली. मात्र ही जोडी तोडायला नॅथन कुल्टर नाईलला यश आले. नॅथनने पंतला हार्दिक पांड्याच्या हाती बाद केलं. पंतने 38 चेंडूत 4 फोर आणि 2 सिक्सह 56 धावांची तडाखेदार खेळी केली.

यानंतर शिमरॉन हेटमायर मैदानात आला. मात्र त्याने फटकेबाजी करण्याआधी ट्रेन्टने त्याला 5 धावावंर माघारी पाठवले. यानंतर कर्णधार श्रेयसने आपले अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर अक्षर पटेल मोठा फटका मारण्याच्या नादात 9 धावांवर बाद झाला. दिल्लीकडून श्रेयस अय्यरने 50 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 65 धावांची खेळी केली.मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. नॅथन कुल्टर नाईलने 2 विकेट्स घेतल्या. तर जयंत यादवने 1 विकेट घेतला.

[svt-event title=”मुंबईचा ‘इशान’दार विजय” date=”10/11/2020,10:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला चौथा धक्का” date=”10/11/2020,10:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला तिसरा धक्का” date=”10/11/2020,10:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 30 चेंडूत 31 धावांची आवश्यकता” date=”10/11/2020,10:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हिटमॅनचे अर्धशतक” date=”10/11/2020,10:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला दुसरा धक्का” date=”10/11/2020,10:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”10 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोअर” date=”10/11/2020,10:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोअर” date=”10/11/2020,9:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”5 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोअर” date=”10/11/2020,9:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला पहिला धक्का” date=”10/11/2020,9:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हिटमॅन रोहितच्या मुंबईसाठी 4 हजार धावा पूर्ण” date=”10/11/2020,9:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची आक्रमक सुरुवात” date=”10/11/2020,9:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात” date=”10/11/2020,9:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतची अर्धशतकी खेळी, मुंबईला विजयासाठी 157 धावांचे आव्हान” date=”10/11/2020,9:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला सहावा झटका” date=”10/11/2020,9:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला पाचवा झटका” date=”10/11/2020,9:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”श्रेयस अय्यरचे अर्धशतक” date=”10/11/2020,8:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 16 ओव्हरनंतर” date=”10/11/2020,8:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतच्या खेळीच्या अंत” date=”10/11/2020,8:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” ऋषभ पंतचे अर्धशतक” date=”10/11/2020,8:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 14 ओव्हरनंतर” date=”10/11/2020,8:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या 13 ओव्हरनंतर धावा” date=”10/11/2020,8:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”10/11/2020,8:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचा 9 ओव्हरनंतर स्कोअर” date=”10/11/2020,8:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या 50 धावा पूर्ण” date=”10/11/2020,8:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर दिल्लीच्या धावा” date=”10/11/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीची 5 षटकानंतर धावसंख्या” date=”10/11/2020,7:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला मोठा धक्का” date=”10/11/2020,7:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला दुसरा झटका” date=”10/11/2020,7:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचा 1 ओव्हरनंतर स्कोअर” date=”10/11/2020,7:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला पहिला धक्का” date=”10/11/2020,7:33PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”हिटमॅन रोहित शर्माचा आयपीएलमधील 200 वा सामना” date=”10/11/2020,7:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[/svt-event]

[svt-event title=”असे आहेत दोन्ही संघांचे खेळाडू” date=”10/11/2020,7:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचे अंतिम 11 शिलेदार” date=”10/11/2020,7:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई प्लेइंग इलेव्हन” date=”10/11/2020,7:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीने टॉस जिंकला” date=”10/11/2020,7:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अर्ध्या तासानंतर होणार टॉस” date=”10/11/2020,6:33PM” class=”svt-cd-green” ] टॉसचा बॉस कोण, थोड्याच वेळेत कळणार [/svt-event]

[svt-event title=”सामना सुरु होण्यासाठी उरली काही मिनिटं” date=”10/11/2020,6:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

मुंबई दिल्लीला वरचढ

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई आणि दिल्ली आतापर्यंत एकूण 27 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 27 पैकी 15 सामन्यात मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला आहे. तर दिल्लीनेही मुंबईचा 12 वेळा पराभव केला आहे. मुंबईने या मोसमातील साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात दिल्लीचा पराभव केला. तसेच क्वालिफायर 1 सामन्यातही मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला. त्यामुळे मुंबई दिल्लीवर वरचढ राहिली आहे.

मुंबईची अंतिम सामना खेळण्याची सहावी तर दिल्लीची ही पहिलीच वेळ आहे. मुंबई आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 4 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. तर दिल्लीला आयपीएलच्या 13 मोसमात पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहचण्यास यश आले आहे. मुंबई अनुभवी टीम असली तरी दिल्लीचा मुंबईवर दबाव आणण्याचा प्रयत्न असणार आहे.

मुंबईने या मोसमातील साखळी सामन्यातील 2 आणि क्वालिफायर 1 अशा एकूण 3 सामन्यात दिल्लीचा पराभव केला आहे. त्यामुळे मुंबई दिल्लीवर वरचढ आहे. मात्र तरही या अंतिम सामन्यात कोण कोणावर वरचढ ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार) कायरन पोलार्ड, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पेटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कृणाल पांड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, कगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, अक्षर पटेल, संदीप लमिछाने, किमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिक नोर्तजे, अॅलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोयनिस आणि ललित यादव.

संबंधित बातम्या :

IPL 2020 Final MI vs DC : हिटमॅन रोहित शर्माची आयपीएल फायनल सामन्यांमधील कामगिरी

IPL 2020, Qualifier 1, MI vs DC : जसप्रीत बुमराहची कमाल, दिल्लीवर 57 धावांनी मात, मुंबईची सहाव्यांदा फायनलमध्ये धडक

IPL FINAL 2020, MI vs DC : पर्पल कॅपसाठी कगिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराहमध्ये कडवी झुंज

ipl 2020 final mi vs dc live score update cricket match mumbai indians vs delhi capitals final in dubai live

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.