साताऱ्यातील एकाच कुटुंबातल्या चौघांच्या हत्येचे गूढ उकलले

प्राथमिक तपासात ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीने पैशाच्या देवाणघेवाणीतून हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे.

साताऱ्यातील एकाच कुटुंबातल्या चौघांच्या हत्येचे गूढ उकलले

सातारा : सातारा जिल्ह्यात झालेल्या एकाच कुटुंबातील चौघा जणांच्या हत्येचे गूढ उकलले आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतून चौघांच्या हत्या केल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली आहे. (Murder Mystery of Four Members of Sangli Family killed in Satara solved)

मयत कुटुंब मूळ सांगली जिल्ह्यातील बामणोली येथील आहे. या प्रकरणी जावळी तालुक्यातील सोमर्डी गावातील संशयित योगेश निकम याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक तपासात ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीने पैशाच्या देवाणघेवाणीतून हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे.

ज्या मार्ली घाटात मृतदेहाचे तुकडे करुन दरीत टाकले होते, त्या ठिकाणी महाबळेश्वर ट्रेकर्स आणि शिवेंद्र ट्रेकर्सची टीम चौथा मृतदेह शोधण्याचे काम करत आहे.

काय आहे प्रकरण?

सातारा जिल्ह्यात सिरीयल किलर संतोष पोळ हत्याकांडासारख्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जावळी तालुक्यातील मेढा मार्ली घाटामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा खून करुन मृतदेहांचे तुकडे करुन फेकून देण्यात आले होते. आतापर्यंत तिघांचे मृतदेह सापडले असून एका मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांची जंगलात हत्या करुन चौघांचे मृतदेह प्लास्टिक बॅगेत भरुन घाटात फेकून देण्यात आले होते. ग्रामस्थांना उग्र वास आल्याने त्यांनी मेढा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने यातील तीन मृतदेह बाहेर काढले.

विशेष म्हणजे, 11 ऑगस्टला पहिला मृतदेह (पतीचा) सापडला होता. त्यानंतर थेट 29 ऑगस्टला पत्नीचा मृतदेह सापडला, तर 31 ऑगस्टला एका मुलाचा मृतदेह शोधण्यात महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलिसांना यश आले. दुसऱ्या मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

संबंधित बातम्या : 

साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा खून करुन जंगलात फेकलं, एक जण ताब्यात

(Murder Mystery of Four Members of Sangli Family killed in Satara solved)

Published On - 3:36 pm, Tue, 1 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI